कीव ः इस्त्रायलने पुन्हा एकदा गाझामध्ये आक्रमक धोरण स्वीकारले असून, इस्त्रायलने केलेल्या एअर स्टाईकमुळे गाझमध्ये 20 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्
कीव ः इस्त्रायलने पुन्हा एकदा गाझामध्ये आक्रमक धोरण स्वीकारले असून, इस्त्रायलने केलेल्या एअर स्टाईकमुळे गाझमध्ये 20 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. या एअर स्टाईकचे चित्र भयावह असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे युद्ध पेटलेले असताना, गाझावरून इस्रायलमध्ये राजकीय संघर्षही पेटला आहे. गाझावर कोणाची सत्ता असेल यावरून राजकीय नेत्यांमध्ये प्रचंड वाद सुरू आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे कट्टर विरोधक बेनी गँट्स यांनी थेट धमकी दिली आहे. 8 जूनपर्यंत याबाबत कोणतीही योजना तयार केली नाही तर सरकार सोडणार असल्याचे ते म्हणाले.
गेल्या काही काळापासून गाझाबाबत इस्त्रायलमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने सुरु आहेत. या युद्धानंतर गाझावर राज्य कोण करणार हे इस्त्रायली नेते ठरवतात. याच मुद्द्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे मुख्य असलेले राजकीय प्रतिस्पर्धी बेनी गँट्झ यांनी येत्या महिन्यांच्या 8 जूनपर्यंत काही योजना तयार न केल्यास सरकार सोडण्याची धमकी दिली आहे. इस्रायलमध्ये सुरु असलेल्या युद्धानंतर नियोजनाच्या चर्चेला नव्याने गती मिळत असली तरी युद्ध अधिक आक्रमक होत आहे. सध्याच्या आठवड्यात, हमासने उत्तर गाझाच्या काही विभागामध्ये पुन्हा एकत्र येण्यास सुरुवात केली आहे ज्यात युद्धाच्या सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणात बॉम्बफेक करण्यात आले होते आणि ज्यात इस्रायली भूदल आधीच कार्यरत होते.
COMMENTS