Homeताज्या बातम्याविदेश

हमासचा प्रमुख इस्माईल हानियाचा खात्मा

इस्त्रायल-इराणमध्ये युद्ध भडकण्याची शक्यता

हमासचा सुप्रीम कमांडर इस्माइल हानिया याचा खात्मा करण्यात आला आहे. तेहरानमधील त्यांच्या घराला लक्ष्य करून स्फोट घडवून आणण्यात आला, ज्यामध्ये हमास

बालिका वधू फेम अभिनेत्री लग्नबंधनात अडकली
माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड काय घेणार भूमिका ; स्वतंत्र आघाडी की राष्ट्रवादी ?
आत्मा मालिक मध्ये साईच्या कुस्ती प्रशिक्षणासाठी खेळाडूंची भरती

हमासचा सुप्रीम कमांडर इस्माइल हानिया याचा खात्मा करण्यात आला आहे. तेहरानमधील त्यांच्या घराला लक्ष्य करून स्फोट घडवून आणण्यात आला, ज्यामध्ये हमास प्रमुख इस्माइल हानिया आणि त्याचा एक अंगरक्षक ठार झाला. इराणच्या नव्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी समारंभातून परतत असताना मंगळवारी इराणमध्ये त्यांची हत्या झाली. इराणच्या आर्मी रिव्होल्युशनरी गार्ड्सने या बाबत निवेदन जारी करून या घटनेला दुजोरा दिला आहे. इस्माईल यांची हत्या झाल्याचे हमासने म्हटले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ’आम्ही पॅलेस्टाईन व अरब देशाच्या लोकांना अत्यंत दुःखाने कळवू इच्छितो की हमासच्या राजकीय शाखेचा नेता इस्माइल याचा मृत्यू झाला आहे. तेहरानमध्ये त्याच्या लपून बसलेल्या इस्रायलच्या हेरांनी ठार मारले. इराणच्या नव्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी समारंभातून परतत असताना ही घटना घडली.इराणच्या नव्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी इस्माईल हानियाचा तेहरानला पोहोचले होते. त्याचबरोबर इस्रायलने इस्माईल लपून असलेल्या ठिकाणावरही हवाई हल्ला केल्याचा दावा हमासने केला आहे. हमासने गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला होता. या हल्ल्यात सुमारे 1200 इस्रायली मारले गेले. याशिवाय 250 लोकांना ओलीस ठेवण्यात आले होते. तेव्हापासून इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. इस्माईलची हत्या ही इस्रायलसाठी मोठे यश मानले जात आहे. इतकेच नाही तर इराणसाठीही हा मोठा धक्का मानला आहे. कारण इराणच्या राजधानीत इस्माईलची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे आता इराणच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. हमासला इराण समर्थित दहशतवादी संघटना मानली जाते. एवढेच नाही तर लेबनॉनस्थित दहशतवादी संघटना हिजबुल्लाहने नुकतेच इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्लाही केला होता. या हल्ल्यात 12 मुलांचा मृत्यू झाला होता.

COMMENTS