Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इस्लामपूर काँग्रेस कार्यालयाच्या मालकी हक्काचा वाद शरद पवारांच्या कोर्टात

दिल्ली : पक्ष कार्यालयाच्या मालकीबाबत राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांना निवेदन देताना जितेंद्र पाटील, विजय पवार, शाकीर तांबोळी. इस्लामपूर /

कामेरीच्या कु. सृष्टी पाटील हिची एनडीए मध्ये निवड
दोन मुलींना कंबरेला बांधून विवाहितेची आत्महत्या
लोणंद मधील नव्या पाण्याच्या टाकीचे उदघाटन कुणासाठी थांबलय?

इस्लामपूर / प्रतिनिधी : शहरातील तहसीलदार कचेरी शेजारील मोक्याच्या ठिकाणी असणारे पक्ष कार्यालय आमचेच आहे. ते आमच्या ताब्यात मिळावे यासाठी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्याकडे दिल्ली येथे भेटून आपली भूमिका मांडली. आता कार्यालयाच्या मालकी हक्कावरून राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये असणारा वाद राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या कोर्टात पोहचला आहे.
वाळवा तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील, युवक प्रदेश काँग्रेस सचिव विजय पवार, काँग्रेसचे प्रदेशउपाध्यक्ष (अल्पसंख्याक) शाकीर तांबोळी यांनी भेट घेत या प्रश्‍नावर स्वतः लक्ष घालावे, अशी मागणी केली. शनिवारी होणार्‍या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सोबत चर्चा करू. इस्लामपूरच्या कार्यालयाच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन दिल्याची माहिती अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, आमच्याकडे असणार्‍या कागदपत्रांच्या आधारे पक्ष कार्यालय आमच्याच मालकीचे आहे. तर सन 1999 च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून काँग्रेस कमिटीत राष्ट्रवादीचे पदाधिकारी वापरत आहेत. काही महिन्यांपूर्वी इस्लामपूरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत झालेल्या ओबीसी मेळाव्यात राष्ट्रवादी कार्यालयाची जागा ही काँग्रेसची असल्याबाबात चर्चा झाली होती. चर्चेच्या फेर्‍या झाल्यावर आणि आता शरद पवार व नाना पटोले काय भूमिका घेणार याबाबत तालुक्यात उत्सुकता आहे.


आंदोलन, धरणे, इशार्‍यांतर शरद पवारांनी दिली भेटीसाठी वेळ
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या हक्कावरून काँग्रेस पक्षातर्फे पत्रकार परिषदेत सर्व पुरावे सादर केले होते. एक दिवशीय धरणे आंदोलन केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने नैतीकतेच्या आधारावर कार्यालय सोडले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जायचे की नाही याचा विचार करावा लागेल. आमच्या मागणीला प्रतिसाद दिला नाही तर आम्हाला काँग्रेस कार्यालयात घुसावे लागेल. शरद पवार यांच्या घरासमोर आंदोलन करू, असा इशारा दिला होता. या पार्श्‍वभूमीवर शरद पवार यांनी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील यांना शिष्टमंडळासहित भेटण्यासाठी दिल्लीत वेळ दिली होती. त्यानुसार शिष्टमंडळाने भेटून आणि आपली भूमिका मांडली.

COMMENTS