Homeताज्या बातम्यादेश

इसिसचा दहशतवादी रिझवान अलीला अटक

स्वातंत्र्यदिनाआधीच राजधानीत दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली ः स्वातंत्र्यदिनाच्या आधीच दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पुण्यातील आयएसआयएस मॉड्युलचा दहशतवादी रिझवान अलीला अटक केली आहे. पोलिसांनी

डीलरशीप देण्याच्या आमीषाने केली…13 लाखाची फसवणूक
सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकाच मंचावर येणार ?
मुंबईत एसी लोकलवर दगडफेक

नवी दिल्ली ः स्वातंत्र्यदिनाच्या आधीच दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पुण्यातील आयएसआयएस मॉड्युलचा दहशतवादी रिझवान अलीला अटक केली आहे. पोलिसांनी ही कारवाई राजधानी दिल्लीत केली असून, रिझवानवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने अर्थात एनआयएने 3 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते.या दहशतवाद्यालाही पोलिसांनी 2018 मध्ये चौकशीसाठी ताब्यात घेतले होते पण नंतर सोडून दिले होते. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला 15 ऑगस्टपूर्वी मोठे यश मिळाले आहे. रिझवान हा दिल्लीतील दर्यागंजचा रहिवासी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिझवान हा इसिसच्या पुणे मॉड्यूलचा भाग होता आणि राष्ट्रीय तपास संस्थेच्या मोस्ट वॉन्टेड यादीत त्याचा समावेश होता. जुलै 2023 मध्ये तो पुणे पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला होता. रिझवानला शुक्रवारी सकाळी दिल्ली-फरीदाबाद सीमेवरून शस्त्रास्त्रांसह पकडण्यात आले. स्वातंत्र्यदिनापूर्वी राजधानीत त्याच्या उपस्थितीची चौकशी केली जात आहे. त्याच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एनआयएच्या वाँटेड यादीत रिझवानसह एकूण चार दहशतवादी आहेत. यापैकी मोहम्मद शाहनवाजला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अटक करण्यात आली होती. एनआयएच्या वाँटेड यादीत रिझवानसह एकूण चार दहशतवादी आहेत. यापैकी मोहम्मद शाहनवाजला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अटक करण्यात आली होती. एनआयएने दहशतवादी प्रकरणांमध्ये फरार असलेल्या रिझवान अलीचे छायाचित्रही प्रसिद्ध केले होते. यामध्ये एकूण चार दहशतवादी होते. यापैकी मोहम्मद शाहनवाजला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अटक करण्यात आली होती. अब्दुल्ला फैयाज उर्फ डायपरवाला अद्याप फरार आहे. तल्हा लियाकतबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. रिझवानचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी दिल्ली पोलिसांचे छापे सुरू आहेत. दिल्लीत 15 ऑगस्टला होणार्‍या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमापूर्वी रिझवानची अटक महत्त्वाची मानली जात आहे.

COMMENTS