Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उर्फी जावेद प्रकरणावरुन भाजपमध्येच चित्रा वाघ एकाकी ?

मुंबई/प्रतिनिधी ः भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री उर्फी जावेदविरोधात मोर्चा उघडला असला तरी, चित्रा वाघ यांच्या समर

राष्ट्रवादीचे आ.अमोल मिटकरी यांना अर्धांगवायूचा झटका LokNews24
भाजपने जनआक्रोश सभेत बायका नाचवल्या, त्याचे काय ?
तुम्ही उद्या ब्लू फिल्म टाकून त्याचं उत्तर मागल; चित्रा वाघ यांना सवाल.

मुंबई/प्रतिनिधी ः भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री उर्फी जावेदविरोधात मोर्चा उघडला असला तरी, चित्रा वाघ यांच्या समर्थनार्थ भाजपमध्ये कोणताही नेता पुढे आलेला नाही. किंवा चित्रा वाघचे समर्थन देखील केले नाही. चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर कारवाईसाठी पोलिस आयुक्तांची भेट घेतली होती. शिवाय गृहखाते भाजपमध्ये असल्यामुळे कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र कारवाई होतांना दिसून येत नाही. त्यामुळे भाजपमध्ये चित्रा वाघ एकाकी पडत असल्याचे चित्र आहे.

अभिनेत्री उर्फी जावेद हिच्या कपड्यांवरून आक्षेप घेत भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सुरू केलेला वाद वरिष्ठ नेत्यांना फारसा रुचलेला नसल्याने त्यांनी वाघ यांचे समर्थन केलेले नाही. पोलिस उर्फीला अटक का करीत नाहीत, असा जाहीर आक्षेप वाघ यांनी घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्याला लक्ष्य केल्याने वाघ या पक्षात एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. उर्फीने स्त्री म्हणून काहीही वावगे केलेले नाही, असा निर्वाळा खुद्द अमृता फडणवीस यांनीही दिल्याने वाघ यांना आता हा वाद आवरावा लागण्याची चिन्हे आहेत. उर्फी जावेद हिचा नंगा नाच चालू देणार नाही, असा इशारा देत चित्रा वाघ यांनी तिच्या कपड्यांवरुन आक्षेप घेतले. तिला अटक करण्याची मागणी करीत पोलिस आयुक्तांकडे तक्रारही दाखल केली. पण पोलिस कारवाई करीत नसल्याने आणि उर्फी त्यांना रोज डिवचत असल्याने वाघ संतापल्या असून त्यांचे व उर्फी जावेद यांचे ट्विटर युद्ध सुरूच आहे.

उर्फीने वाघ यांचा उल्लेख ‘ माझी सासू ‘ असा केल्याने समाजमाध्यमांवर आणि जनतेमध्येही या कपड्यांवरून सुरू असलेल्या वादाचे पडसाद उमटत आहेत. जनतेचे प्रश्‍न व अन्य महत्वाचे मुद्दे सोडून भाजप नेते किरकोळ गोष्टींवरून वाद का उकरून काढत आहेत, अशी चर्चा सुरू आहे. फडणवीस गृहमंत्री असताना पोलिस कारवाई करीत नाहीत, याचा अर्थ त्यांनाही हा वाद नापसंत असताना अमृता फडणवीस यांनी तर जाहीरपणेच उर्फीने काहीच वावगे केले नसल्याचे स्पष्ट केले आहे. प्रत्येकाची वेगळी मते असू शकतात, त्यामुळे चित्रा वाघ यांनी त्यांची मते मांडली. पण उर्फी जावेद ही सुद्धा आपले करियर करीत असून तिने चुकीचे काहीच केलेले नाही, असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केल्याने चित्रा वाघ यांची पंचाईत झाली आहे. भाजप नेतेही उघडपणे चित्रा वाघ यांना समर्थन देत नसल्याने त्यांना हा जाहीर वाद संपवावा लागण्याची शक्यता आहे.

COMMENTS