Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बच्चू कडू यांचे जिल्हा बँकेचे अध्यक्षपद धोक्यात ?

अमरावती : माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे अमरावती जिल्हा बँकेचे अध्यक्षपद धोक्यात आल आहे. कारण सत्ताधार्‍यांनी उपविधीतील

देशात यंदा 96 टक्के पाऊस होणार
आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र
शाळेसमोरुन अपहरण करून धावत्या गाडीत अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

अमरावती : माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे अमरावती जिल्हा बँकेचे अध्यक्षपद धोक्यात आल आहे. कारण सत्ताधार्‍यांनी उपविधीतील सूचविलेल्या दुरुस्त्या फेटाळात नाही तर त्यांच्या पाच संचालकांविरोधातील अविश्‍वास प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांच्यावर विरोधकांनी थेट वार केला आहे. त्यांच्या एका याचिकेवर विभागीय सहनिबंधकांनी अध्यक्ष बच्चू कडू यांना संचालक पदावरून अपात्र करण्याबाबत नोटिस बजाविल्याने जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेची सत्ता बच्चु कडू यांनी काबीज केल्यानंतर माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या गटाने सत्ताधार्‍यांविरोधात तक्रारींचा सपाटा सुरू केला. सत्ताधार्‍यांनी केलेल्या अनेक महत्वांच्या निर्णयांविरोधात विभागीय सहनिबंधकांसह सहकारमंत्री ते उच्च न्यायालयापर्यंतचा प्रवास या गटाने सुरू केला आहे. मागील महिन्यात सत्ताधर्‍यांनी सूचविलेल्या उपविधीतील दुरुस्त्यावर बबलू देशमुख गटाने आक्षेप घेतल्यानंतर त्या फेटाळण्यात आल्या आहेत. त्यानंतर लगेच सत्ताधारी गटातील पाच संचालकांविरोधात अविश्‍वास प्रस्तावाला न्यायालयाने हिरवी झेंडी दिल्याने विभागीय सहनिबधंकांनी येत्या 14 फेब्रुवारीला अविश्‍वास ठरावाकरिता विशेष सभा बोलावली आहे. याच दरम्यान बबलू देशमुख गटातील संचालक हरीभाऊ मोहोड यांच्यासह 11 संचालकांनी बॅकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना बँकेच्या संचालक पदावरून अपात्र करण्याबाबतची याचिका दाखल केली. नाशिक जिल्हा न्यायालयाने त्यांना एका प्रकरणात एका वर्षाची शिक्षा ठोठावल्याचा दाखला त्यांनी यामध्ये दिला होता.

COMMENTS