Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आय पी एस संदीप कर्णिक नाशिकचे नवीन पोलीस आयुक्त  

राज्यात पुढील वर्षी लोकसभा , विधानसभा  निवडणुका होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण हालचालींना वेग आल्याने राजकीय स्थित्यंतरे वेळोवेळी

इंडिया आघाडीची पहिली सभा होणार भोपाळमध्ये
पाणी पुरवठ्याच्या सर्व योजना सौर ऊर्जेवर कार्यान्वित करणार ः उपमुख्यमंत्री फडणवीस
जया बच्चनला घाबरतात अमिताभ बच्चन ?

राज्यात पुढील वर्षी लोकसभा , विधानसभा  निवडणुका होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण हालचालींना वेग आल्याने राजकीय स्थित्यंतरे वेळोवेळी बदलत असून नाशिक शहर देखील कुठल्याच बाबतीत कमी राहीले नाहीत. त्यामुळे नाशिक शहराच्या वाढत्या समस्यां खूप मोठ्या प्रमाणात आहेत. समस्यां मध्ये आमच्या नाशिक चा क्राईम प्रत्यक्षदर्शनी मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने अनेक संकटे नाशिक ची जनता प्रत्यक्ष बघत आहेत. 

अलीकडेच चार ते पाच दिवसांपूर्वी पुण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त आय पी एस संदीप कर्णिक यांची नाशिक पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्याने पोलीस डिपार्टमेंट देखील अचंबित झाले. त्याचे कारण देखील तसेच आहेत. कारण नाशिकचे मावळते पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची दहा महिन्यात नाशिक मधून तडकाफडकी बदली करण्यात आली. नाशिक शहर व ग्रामीण विविध समस्यांचे मोठे अड्डे बनु पाहत आहेत. ते उदवस्त करणे ही पोलिसांसह नागरिकांची सामूहिक जबाबदारी असल्याने डॅशिंग अधिकारी म्हणून कर्णिक यांची ओळख असल्याने नाशिक च्या जनतेस कर्णिक यांच्या निमित्ताने नवीन आयुक्त बघावयास मिळाले. मात्र विषय इथेच थांबला नाहीत तर आयुक्त कर्णिक यांनी चार्ज घेतला तोच खुनाचे सत्र सुरू राहिल्याने कशा पद्धतीने प्रकरणे हँडल करणार ?  अशा प्रकारे शहरात बोलबाला सुरू झाला आहेत.

नाशिक शहर सध्या राज्यासह देशपातळीवर चर्चेत असून अलीकडेच ड्रग्स प्रकरण खूपच गाजले. मुंबई पोलिसांनी केलेली कार्यवाही ही नाशिक करांच्या तोंडाचा चंबू करून गेलीत.त्यामुळे कुठे तरी शिंदे यांच्या बाबतीत नाराजीचा सूर असला तरी ती प्रथा वा परंपरा आयुक्त कर्णिक  मोडून काढतील अशी अपेक्षा नाशिकच्या नागरीकांना आहेतच. 

डॅशिंग अधिकारी म्हणून ओळख 

कर्णिक यांनी इलेक्‍ट्रॉनिक इंजिनीअरची पदवी प्राप्त केली. त्यानंतर 2004 मध्ये ते भारतीय पोलिस सेवेमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी नगर, ठाणे, नागपुर,जालना, नांदेड अशा वेगवेगळ्या जिल्ह्यात विविध पदांवर कर्तव्य बजावले आहे. पुणे ग्रामीण पोलिस दलाचे अधिक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहीले आहे. मुंबईच्या पश्‍चिम प्रादेशिक विभागाचे अतिरीक्त पोलिस आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळला. अलीकडे ते दोन वर्षांपासून पुण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते मात्र गृहविभागाने नाशिक च्या थेट पोलीस आयुक्तपदी त्यांची बदली केल्याने नाशिककर देखील सुखावले आहेत.

आयुक्तांपुढील समस्यां अनेक मात्र नागरिकांची तक्रार एकच 

“सुखी ठेवा” 

होय बरोबरच सुखी रहायचे तर आपण नाशिककरांनी देखील जबाबदारी घेऊन वागले पाहिजे व तसा प्रतिसाद देखील दिला पाहिजे. नाहीतर मग खाकीचा दणका वेळोवेळी बघायला मिळतोच , तो उगीचच नाहीत.सर्व सामान्य नाशिककर सुखी ठेवा जरी म्हणत असले तरी पोलीस वर्दीतील समस्यां देखील नागरिकांच्या समस्यां प्रती भिन्न आहेत त्यामुळे आपणच शहाणे होऊन वागले तर सुखी ठेवा म्हणायची वेळ येणार नाहीत.

नाशिककरांनी आता पर्यंत विविध समस्यां बघितल्या तसतसे अधिकारी वेळोवेळी बदलत गेले मात्र सर्व सामान्य , नागरिक , छोटे मोठे व्यापारी , नोकरदार , आणि मजूर वर्ग यांना काही समस्यां असल्यास थेट पोलीस स्टेशन गाठावे लागते. यात शंका नाहीच मात्र डिजिटल व्यवस्थेत वा विज्ञान युगात सर्व जगत असतांना आधुनिक तंत्रज्ञानाची पर्यायी व्यवस्था नागरिकांनी स्विकारलेली दिसत नाहीत। त्यामुळे आपल्या माध्यमातून नागरिकांना जागरूक करता येईल का असे विविध प्रश्न आपल्या कार्यकिर्दीत अधोरेखित राहतील.

गुटखा , दारू, मटका , जुगार , लॉज , ड्रग्स , सध्या शहराच्या भोवती घिरट्या घालत असतांना. आपणाकडून सर्व नाशिककर फाटा देत चांगल्याच कामाची अपेक्षा का करू नये ? आयुक्त पदी आपण पदभार स्विकारला त्यामुळे आपले स्वागतच परंतु आम्हा कस्टकरी नागरिकांचे जीवन बेहाल होऊ नये हीच अपेक्षा ठेवून आपल्या त्या खाकी वर्दीला सलाम. जय हिंद 

योगेश रोकडे  निवासी संपादक  ९४२२८९२१९८

COMMENTS