आयपीएल : विजेता होतो की ठरतो !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

आयपीएल : विजेता होतो की ठरतो !

 क्रीडा संस्कृती जोपासणाऱ्या देशांचा खरा कस लागतो तो ऑलिम्पिक सारख्या जागतिक स्पर्धेत! ऑलिम्पिक सारख्या क्रिडाप्रकारात वैयक्तिक देशाचे प्रतिनिधित्व क

पोप बेनेडिक्ट १६ यांच्या स्मृतीत !  
ठाण्यात शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या महिलेला मारहाण
ससून रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र वॉर्ड

 क्रीडा संस्कृती जोपासणाऱ्या देशांचा खरा कस लागतो तो ऑलिम्पिक सारख्या जागतिक स्पर्धेत! ऑलिम्पिक सारख्या क्रिडाप्रकारात वैयक्तिक देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू आपले वैयक्तिक कौशल्य पणाला लावून देशाचा नावलौकिक जगात वाढवतात. वैयक्तिक असो की सांघिक परंतु वेगवान असणाऱ्या क्रिडाप्रकारांना भारतात लोकप्रिय करून त्यांचे ग्लॅमर वाढविण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत! याचे मुख्य कारण म्हणजे भारतातील अशा क्रिडाप्रकारात चे नैपुण्य असणाऱ्या बहुजन समाजातील युवक-युवतींना या सर्वांपासून लांब ठेवता येते, हे या देशातील उच्चजातवर्गीय समाजाने ठरवून टाकले आहे. त्यामुळे अतिशय संथ असणारा तरीही धावते समालोचन करण्याच्या प्रक्रियेत कृत्रिम वेगवान भासवला जाणारा क्रिकेट सारखा क्रिडाप्रकार जाणीवपूर्वक लोकप्रिय केला गेला आहे. या लोकप्रियतेला मोठ्या आर्थिक उलाढालीत रूपांतरित करण्याच्या उद्देशाने याच क्रिकेटमध्ये वीस-वीस षटकांची आयपीएल जन्माला घातली गेली. एव्हाना या आयपीएल चे जनक केव्हाच देशाबाहेर निघून गेले. अब्जावधींची उलाढाल होणाऱ्या आयपीएल सारख्या खाजगी भांडवलदारांच्या या स्पर्धेला सुरूवातीपासूनच विकृत स्वरूप आले आहे. परंतु, भांडवली धिंगाण्यात तो लक्षात येत नाही. कोणत्याही खेळाडूच्या खेळावर जाणकार प्रेक्षक टाळ्याशिट्यांचा कडकडाट करतात. मात्र, या स्पर्धेत चौकार, षटकार मारल्यावर अथवा फलंदाज बाद केल्यावर ललनांचे (चिअर्स गर्ल) नृत्य प्रस्तुत केले जाते. जेणेकरून प्रेक्षकांचा प्रतिसाद दुय्यम ठरवून त्या ललनांच्या तालावर संबंध देशाने थिरकावे अशी ही योजना. एवढ्यापुरतेच हे सर्व असते तरी यावर काही लिहायचे कारण नसते. कारण या गोष्टी आता गेल्या दीड दशकापासून होतच आहेत. आयपीएल सारख्या स्पर्धेत विजय-पराभवाची स्क्रिप्ट देखील आधीच ठरवली जाते, असे म्हणतात.  मुंबई इंडियन्स हा अंबांनींचा, चेन्नई सुपर किंग हा सिमेंट कंपन्यांचा आणि कोलकाता नाईट रायडर्स हा सुपरस्टार शाहरुख खान यांचे संघ हे नैपुण्यवान आणि विजेते अधिक वेळा ठरले. या स्पर्धेला कोरोना काळात अडचण निर्माण झाली होती, म्हणून देशाबाहेर भरविण्यात आली होती. प्रेक्षकांचा त्यावेळी नसणारा प्रतिसाद लक्षात घेता ही स्पर्धा यावर्षी थोडी लवकरच भरविण्यात आली. यंदा या स्पर्धेत गुजरात आणि लखनौ अशा दोन संघांनी नव्याने प्रवेश केला. गुजरात या राज्याचे वैशिष्ट्ये असे की या राज्याला फक्त आर्थिक हित कळते. देशासाठी वीरतेचा इतिहास यांच्या नावे नसल्याचे गेल्या काही वर्षांपासून समाज माध्यमातून ओरड होत असताना अचानक आयपीएल सारख्या स्पर्धेत गुजरात टायटन्स चा संघ दाखल होतो आणि असामाजिक मतांसाठी (कु)प्रसिद्ध असणारा हार्दिक नावाचा कप्तान ज्याच्या नावे यापूर्वी फारसे कतृत्व नाही, तो थेट संघाला या स्पर्धेत विजेता बनवतो, ही बाब एकूणच शास्त्रशुद्ध आकलनात बसणारी नाही! त्याहीपेक्षा मुंबई, चेन्नई आणि कोलकाता हे दर्जेदार संघ अगदींच सुमार कामगिरी या स्पर्धेत करतात, हे सर्व तर्कशुद्ध विचार आणि एकूणच आकलनापलिकडचे वाटते! तसे पाहिले तर क्रिकेट च्या लोकप्रियतेला प्रचंड ओहोटी लागली आहे. परंतु, एकूणच बाजारी व्यवस्थापन राबवून त्यात कृत्रिम लोकप्रियता आणली जात आहे, जी फार काळ चालणार नाही! एकमात्र यानिमित्ताने लक्षात घेण्यासारखी बाब आयपीएल काळात चालणारी सट्टेबाजी दर स्पर्धेच्या वेळेस दुर्लक्षित केली जाते. ज्या सट्टेबाजीत गुजरात बराच अव्वल असतो. यानिमित्ताने एवढेच म्हणायचे की, या क्रिडाप्रकारात होत असलेल्या या सर्व प्रकारातील सत्य या खेळावर प्रेम करणाऱ्या तरूणांना कळावं! त्यांची फसगत होवू नये, ही राष्ट्रीय भावना लक्षात घेऊन या क्रिडाप्रकारातील उजळ बाबी तरूणांना कळणे हा भारतीय तरूणांचा हक्क आहे! पण, तूर्तास एवढे तरी जाणता यावे की आयपीएल विजेता ठरतो की होतो!

COMMENTS