मुंबई ः गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री बच्चू कडू हे महायुतीपासून दुरावले अशी चर्चा सुरू आहे. यातच बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजीनगरात मोठा म
मुंबई ः गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री बच्चू कडू हे महायुतीपासून दुरावले अशी चर्चा सुरू आहे. यातच बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजीनगरात मोठा मोर्चा काढत सरकारला अल्टिमेटम दिला. त्यानंतर त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने ते महायुतीची साथ सोडणार अशी चर्चा रंगली होती. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी बच्चू कडू यांना फोन केला आणि त्यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे. बच्चू कडू लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.
COMMENTS