Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिक येथे गुंतवणूकदार सेवा केंद्र कार्यान्वित 

गुंतवणूकदार सेवा, जागरूकता आणि संरक्षण ही शेअर बाजाराची महत्त्वाची कार्ये आहेत

नाशिक- पंजाब, गुजरात आणि महाराष्ट्रातील सिक्युरिटीज बाजारपेठेतील गुंतवणुकदारांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सेबीने एनएसई आणि बीएसईसह अमृतसर, भावनगर

राहुरी जिजाऊंच्या लेकींच्या जल्लोषाने दणाणली
ओझर नगरपरिषदेस पुर्णवेळ मुख्याधिकारी द्यावा  
संविधान आपल्या देशाचा आत्मा ः जिल्हाधिकारी सालीमठ

नाशिक- पंजाब, गुजरात आणि महाराष्ट्रातील सिक्युरिटीज बाजारपेठेतील गुंतवणुकदारांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सेबीने एनएसई आणि बीएसईसह अमृतसर, भावनगर व नाशिक येथे ‘इन्व्हेस्टर सर्व्हिस सेंटर’ सुरू केली आहेत.३१ डिसेंबर २०२३ रोजी कार्यान्वित झालेली ही गुंतवणूकदार सेवा केंद्रे एनएसईतर्फे चालवली जात आहेत. गुंतवणुकदारांपर्यंत सहज पोहोचता यावे तसेच त्यांना जलद सेवा मिळावी यासाठी एक्सचेंजने नवीन गुंतवणूकदार सेवा केंद्रे सुरू केली आहेत. या केंद्राद्वारे प्रश्नांचे समाधान, समस्यांचे निवारण आणि सेबी स्कोअर पोर्टल तसेच स्मार्ट ओडीआर पोर्टलमध्ये तक्रार नोंदवण्यासाठी आवश्यक सहकार्य केले जाणार आहे. एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशिषकुमार चौहान म्हणाले, ‘गुंतवणूकदार सेवा केंद्रांद्वारे सिक्युरिटीज बाजारपेठेतील गुंतवणुकदारांनी नोंदणीकृत कॉर्पोरेट कंपन्या तसेच इतर नोंदणीकृत मध्यस्थांविरोधात केलेल्या तक्रारींची दखल घेतली जाईल. त्याचप्रमाणे राज्यांत गुंतवणूकदार जागरूकता उपक्रमही राबवले जाणार आहे.’अमृतसर, भावनगर आणि नाशिक येथील आयएससी केंद्रे गुंतवणुकीशी संबंधित सर्व उत्पादनांचे शिक्षण, संवाद, ज्ञान सत्राचे केंद्र बनतील. त्याशिवाय म्युच्युअल फंड्स, एक्सचेंज ट्रेडेड फंड्स, सॉर्वरिन गोल्ड बाँड्स, रियल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (आरईआयटीज), इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (आयएनव्हीआयटीएस) यांच्याशी संबंधित प्रश्नांचे निवारण या केंद्रातर्फे केले जाईल. गुंतवणुकदारांना अमृतसर, भावनगर आणि नाशिक येथील पुढील पत्त्यावर वसलेल्या गुंतवणूकदार सेवा केंद्रांचा लाभ घेता येईल.नाशिक येथील गुंतवणूकदार सेवा केंद्र युनिट्स नं. ६०२, सहावा मजला, रूंगटा सुप्रीमस,चांदक सर्कल, श्री हरी नारायण कुटे मार्ग ,तिडके कॉलनी, महाराष्ट्र – ४२२००२ येथे आहे.

COMMENTS