Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी डॉ.चहल यांची ईडीकडून चौकशी

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबईतील कथित कोडिड सेंटर घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने मुंबई महापालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांची काल

सार्वजनिक स्वच्छता हा दिनचर्येचा भाग झाला पाहिजे : विमल पुंडे
दहशतवादी अकबर पाशाच्या सांगण्यावरून गडकरींना धमकी
पुणे शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये पुन्हा ऑक्सिजनचा तुटवडा

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबईतील कथित कोडिड सेंटर घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने मुंबई महापालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांची काल सोमवारी चौकशी केली. चौकशीनंतर माध्यमांशी बोलतांना डॉ. चहल म्हणाले की, जून 2020 मध्ये कोविड आल्यानंतर वेळीच उपाय योजना केली नाही, तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती. त्यानंतर राज्य सरकारच्या सूचनेनंतर आम्ही मोकळ्या मैदानात जम्बो कोविड सेंटर सुरू केले.
’विविध ठिकाणच्या मोकळ्या जागा घेतल्या त्याचे काम आम्ही संबधित रुग्णालयालाही दिले. मात्र तिथे आम्हाला मनुष्य बळाची कमतरता जाणवली. त्यावेळी कोविड रुग्णालयात जिथे सर्व आमचे आहे. तिथे आम्ही कोटेशन घेऊन चार पार्टींना आऊट सोर्सिंगचे काम दिले, असे चहल पुढे म्हणाले. लाखो लोकांना वेळीच उपचार मिळाले. त्यांचे जीव वाचले. या चार पार्टीचे काम फक्त आम्हाला डॉक्टर आणि कर्मचारी पुरवण्याचे होते. त्यानुसार दिवसाचे त्यांना पैसे देण्याचे ठरवण्यात आले. मात्र यात काहींनी बनावट कागदपत्र सादर केल्याचे निदर्शनास आल्यानंतर आम्ही पोलिसांना पत्र लिहून त्याची शहानिशा करावी असे कळवले, असेही चहल पुढे म्हणाले. ’तसेच पालिकेतर्फे आम्ही सर्व सहकार्य करण्याचे आता ईडीला कळवले आहे. पून्हा चौकशीला बोलावल्यास पून्हा सहकार्य करू, असे चहल यांनी सांगितले.

COMMENTS