भारतात ओमायक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव

Homeताज्या बातम्यादेश

भारतात ओमायक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटने खळबळ माजवली असतांना, या व्हेरियंटचे रुग्ण भारतात न सापडल्यामुळे भारतीयांनी सुटकेचा निश्‍वास टाकल

बाईक अपघातात बाप लेकाचा मृत्यू | LOKNews24
महिलेच्या गळ्यातील साखळी ओढून चोरटे फरार.
मशिदी वरील भोंग्यांचा त्रास आम्ही उदाहरणासह समोर आणला l LOK News 24

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटने खळबळ माजवली असतांना, या व्हेरियंटचे रुग्ण भारतात न सापडल्यामुळे भारतीयांनी सुटकेचा निश्‍वास टाकला होता. मात्र हा सुटकेचा निश्‍वास अल्पजीवी ठरला असून, गुरूवारी भारतात ओमायक्रॉन व्हेरियंटचा शिरकाव झाला असून, कर्नाटकात दोन रुग्ण सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे.
भारतात ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना लव अग्रवाल यांनी कर्नाटकमध्ये ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळल्याचे सांगितले असून आत्तापर्यंत एकूण 29 देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याचे देखील सांगितले. त्यामुळे ओमायक्रॉन आता हळूहळू हातपाय पसरायला लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. कोरोना विषाणूच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत भारताला मोठे नुकसान सहन करावे लागले होते. त्यामुळे ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्‍वभूमिवर सर्व यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या मुद्दाची दखल घेतली असून, संसदेत यावर चर्चा झाली आहे. त्यातच आज हे दोन रुग्ण आढळल्याने आता चिंता वाढली आहे.

COMMENTS