धमकी प्रकरणाची सखोल चौकशी करावी : भुजबळ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धमकी प्रकरणाची सखोल चौकशी करावी : भुजबळ

नाशिक : माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याचे माध्यमांमधून समजले.मागच्या दहा वर्ष जे आमच्या सोबत होते, त्या टेकचंदानी यांनी गुन्हा दाखल केला.त्यांच्यासोबत का

Nashik : भुजबळ साहेबांच्या प्रयत्नाने दिंडोरीतील पर्यटन प्रकल्पामुळे मिळणार विकासाला चालना (Video)
nashik : पोलिस आयुक्तांनी दिला खांदा
बलात्कार, आमदाराला धमकी आणि कर्माची सजा

नाशिक : माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याचे माध्यमांमधून समजले.मागच्या दहा वर्ष जे आमच्या सोबत होते, त्या टेकचंदानी यांनी गुन्हा दाखल केला.त्यांच्यासोबत काहीही संबंध नसून नंबर देखील डिलिट केले आहे.पण ते सतत मला मेसेज करून त्रास देत होता. मी धमकी दिली नाही. बोललो देखील नाही. सरस्वती वादाचा फायदा घेत त्यानी हे केलं आहे. याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्राद्वारे माहिती दिली असून या प्रकरणाची चौकशी करावी, असे खुले आव्हान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिले.
भुजबळ फार्म येथे शनिवारी पत्रकार परिषद घेत भुजबळ यांनी टेकचंदानी प्रकरणी सर्व आरोप फेटाळत भूमिका स्पष्ट केली. टेकचंदानी मला मॅसेज करायचे म्हणून मी सदर नंबर तपासण्यासाठी कार्यकर्त्याला सांगितलं. पुण्याच्या कार्यकर्त्याने त्याला विचारलं तू भुजबळांना का त्रास देतो.त्या वेळी त्यांनी सांगितलं समोर येऊन चर्चा करु.मी त्याला कधीही फोन केला नाही. दुसर्‍याने केला तो ही त्याने उचलला नाही. जे काही झालं ते चॅटिंग वर झालं.पण त्यात देखील धमकी दिलेली नाही.पण हे जे काही जे काही घडलं त्या बद्दल मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहिले आहे.या प्रकरणाची चौकशी करावी. मी जर त्यांच्या सोबत बोलत नाही तर त्याने मला का त्रास द्यावा.छगन लाल चिकी खाय बिकी खाय असे मॅसेज मला का करावे.मी त्याच्याशी कधीही बोललो नाही. तरी देखील सारखे सारखे निगेटिव्ह मॅसेज केले, असा आरोप त्यानी केला.तो व्यक्ती आगोदर मुंडे यांच्याकडे होता. त्या नंतर आमच्या सोबत काम केलं आहे.नंतर त्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर आम्ही त्याला बाजूला केलं.म्हणून त्याने हे सगळ तक्रारी सुरू केल्या. याप्रकरणी मी काहीही तक्रार सद्या करणार नाही.वकिलांचा सल्ला घेईल. मी सरकारला पत्र लिहिलं आहे. ते योग्य ती कारवाई करतील.शेवाळे यांनी देखील अनभिज्ञ पने अस ट्विट केलं असेल. या मागे कुणाचाही हात असेल अस वाटत नाही.या पूर्वी त्याने आम्हाला अनेक केसेस करून गुंतवल. मात्र न्याय देवतेने आम्हाला न्याय दिला, अशी बाजू त्यांनी मांडली.

COMMENTS