Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इंटरपोलने मुंबईतील तरुणाला आत्महत्येपासून रोखले

मुंबई/प्रतिनिधी ः जोगेश्‍वरीत राहाणार्‍या एका 25 वर्षीय माहिती तंत्रज्ञान अभियंत्याने आत्महत्या करण्याची सोपी पद्धत कोणती याबाबत इंटरनेटवर शोधाशो

गावबंदी करणार्‍याला तुरुंगात पाठवा : ना. भुजबळांनी सांगितली कायद्यातील तरतूद
’धर्मनिरपेक्ष’ व ’समाजवादी’ शब्दांवर “सर्वोच्च” खल
अशाप्रकारे दोन महिलांनी चोरल्या 90 हजारांच्या पैठण्या ; पाहा व्हिडीओ I LOKNews24

मुंबई/प्रतिनिधी ः जोगेश्‍वरीत राहाणार्‍या एका 25 वर्षीय माहिती तंत्रज्ञान अभियंत्याने आत्महत्या करण्याची सोपी पद्धत कोणती याबाबत इंटरनेटवर शोधाशोध सुरू केली. ‘संवेदनशील’, ‘भयावह’ अशा प्रकारचे शब्दही गुगूलवर शोधल्याने थेट अमेरिकेतील सुरक्षा यंत्रणा दक्ष झाली. या सुरक्षा यंत्रणेने प्रसंगावधान दाखवत याबाबतची माहिती नवी दिल्लीतील इंटरपोलला दिली. त्यानंतर येथून मुंबई पोलिसांना संपूर्ण माहिती देऊन या अभियंत्याला आत्महत्या करण्यापासून वाचवले. या तरूणाने याआधीही आत्महत्या करण्याचे प्रयत्न केले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले.

याविषयी सविस्तर माहिती अशी की, हाऊ टू सुसाइड विदाऊट पेन’ अशी माहिती एक तरुण गुगलवर शोधत होता. त्याच वेळी इंटरपोलने अमेरिकेतून मुंबई पोलिसांना याबाबत माहिती दिली. काही वेळातच मुंबई पोलिस संबंधित तरुणाच्या घरी पोहोचले आणि त्याचे प्राण वाचवले. ही कथा कुठल्या चित्रपटातील नाही, तर मुंबईतून ही घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, संबंधित तरुणाची ओळख पोलिसांनी जाहीर केली नाही. समीर (नाव बदलले आहे) मुंबईतील एका आयटी कंपनीत नोकरीला आहे. समीर याने काही वर्षांपूर्वी मुंबईत घर घेतले. त्यानंतर त्यांचे हप्ते सुरू झाले. दैनंदिन गरजा भागवण्यासाठी त्याला पगार पुरेनासा झाला. त्यामुळे त्याने विविध वित्तीय संस्थांकडून महागड्या व्याजदराने कर्ज घेतले. या सर्वांचे हप्ते फेडताना त्याची तारांबळ उडत होती. एखाद्या ईएमआयला विलंब झाला तर वित्तीय संस्थांसह बँकेचे अधिकारी फोन करून त्रास द्यायचे. यातून त्याला नैराश्य आले. त्यामुळे तो उदास राहू लागला होता. त्याच्या डोक्यात अनेक दिवसांपासून आत्महत्या करण्याचा विचार सुरू होता. त्याने गुगलवर हाऊ टू सुसाइड विदाऊट पेन’ अशी माहिती सर्च केली. मात्र, अमेरिकेतून इंटरपोलच्या एका अधिकार्‍याने हे पाहून मुंबई पोलिसांना लगेच कळवले. इंटरपोलने मुंबई पोलिसांना संबंधित तरुणाचे लोकेशन आणि आयपी अ‍ॅड्रेसची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याची माहिती काढली आणि तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या वेळी पोलिसांनी त्याच्यासह पालकांचे समुपदेशन केले आहे. समीर याने यापूर्वी तीनदा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आहे. आता त्याच्यावर करण्यात येत आहेत.

COMMENTS