आष्टी प्रतिनिधी - राळेगणसिद्धी येथे थोर समाजसेवक पद्मभूषण डॉ अण्णासाहेब हजारेंच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कार्य
आष्टी प्रतिनिधी – राळेगणसिद्धी येथे थोर समाजसेवक पद्मभूषण डॉ अण्णासाहेब हजारेंच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कार्यशाळा व वृक्षमित्र स्वर्गीय आबासाहेब मोरे यांची जयंती राळेगणसिद्धी येथे पार पडली.प्रथम मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलन व स्वर्गीय वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांचे प्रतिमा पुजन झाले.आबासाहेब मोरे यांची जयंती साजरी करण्यात आली.डोहाळे,बारसे,वाढदिवस,लग्न समारंभ,धार्मिक कार्यक्रम,इ.कुठलाही घरगुती कार्यक्रम असो, वृक्षलागवड,वृक्षवाटप करूनच करावा.अध्यक्ष प्रमोद दादा मोरे निसर्ग व सामाजिक पर्यावरण
प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य यांनी 5 जूनच्या पर्यावरण कार्यशाळेत राळेगणसिद्धी येथे आव्हान केले.निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य चे कार्य पर्यावरण प्रबोधनात्मक आहे.एक मोठी पर्यावरण चळवळ उभी रहात आहे.यासाठी पर्यावरण पुरक जनजागृती काळाची गरज आहे.आपले पर्यावरण मंडळ पर्यावरणीय चळवळीचे केंद्रबिंदू ठरत आहे.गेली दोन दशके आपण कार्यरत आहोत.राळेगणसिद्धी येथे जागतिक पर्यावरण दिन व मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र स्वर्गीय आबासाहेब मोरे यांची जयंती दिन आणि नुतन राज्य कार्यकारिणी नियुक्ती पत्रे प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. वृक्षमित्र स्वर्गीय आबासाहेब मोरे यांचे कार्य नजरेसमोर ठेवून कार्य करत रहावे असेही आव्हान प्रमोद दादा मोरे यांनी केले.मंडळाचे कार्य मी तन मन धनाने करीन असेही ते म्हणाले..सर्व निसर्ग प्रेमी/स्नेहीनी योग्य ते सहकार्य पण करावेच असे नमुद केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यशाळेमध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नेत्रचिकित्सक पद्मश्री डॉ.विकास महात्मे यांच्या हस्ते पत्रकार अण्णासाहेब साबळे यांना राज्य प्रसिद्ध प्रमुख पत्र प्रदान करण्यात आले.तसेच राज्य संपर्क प्रमुख पत्र उत्तम पवार सर यांना प्रदान करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ सामाजसेवक पद्मभूषण डॉ.अण्णासाहेब हजारे यांनीही पत्रकार अण्णासाहेब साबळे यांना आशीर्वाद दिला.यावेळी व्यासपीठावर सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे,नेत्रतज्ञ डॉ सुधा कांकरिया,शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण दिनकरराव टेमकर,उपवनसंरक्षक सुवर्णा माने,वनाधिकारी सचिन कंद, थए चांगुलपणाची चळवळीचे राज देशमुख,मंडळाच्या सचिव श्रीमती वनश्रीताई मोरे,या कार्यशाळेसाठी अहमदनगर सह 24 जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.अलीभाई देखानी,डॉ सोमनाथ पाटील,आलोक काळे,मनकर्णा जाधव,शुभांगी आपटे,इ.यांचा विशेष पुरस्कारार्थी म्हणुन विशेष पुरस्कार देऊन सन्मानित केले.यावेळी विलास महाडिक,धीरज वाटेकर,शैलजा आखाडे,मोहन पाटील,मायावती शिपटे,संगीता गावडे,विजय बोडखे,कोंडीराम नेहे,सुहास गावीत,अमोल चंदनशिवे,अनिल लोखंडे,अर्जुन राऊत,पोपट पवार,तुकाराम आडसुळ,प्रमोद काकडे,सचिव सुभाष वाखारे,लतिका पवार,स्वाती अहिरे,सोनल तरटे,बेबी कांबळे,छाया बंडगर, छायाताई राजपुत,ज्ञानेश्वर गोरे,प्रा.बबन जाधव उपाध्यक्ष श्री प्रकाश केदारी,यांचेसह शेकडो पर्यावरण स्नेही प्रेमी सहभागी झाले होते.आभार प्रमोद काकडे सर कार्याध्यक्ष यांनी मानले.
COMMENTS