Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सलग 11 व्यांदा व्याजदर जैसै थे !; विकासदर 6.6 टक्के राहण्याचा अंदाज

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा व्याजदर जैसे थे ठेवल्यामुळे कर्जदारांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. विशेष म्हणजे सलग 11 व्यांदा व्

जीडीपीमध्ये 40 वर्षांतील सर्वाधिक घट
गुलाम नबी आझाद स्वगृही परतण्याचे संकेत
पुणे जिल्हा नियोजन समितीवर भाजप, शिंदे गटाचे वर्चस्व

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा व्याजदर जैसे थे ठेवल्यामुळे कर्जदारांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. विशेष म्हणजे सलग 11 व्यांदा व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या निर्णयामुळे रेपो रेट हा 6.5 टक्क्यांवर कायम असेल. सध्याची वाढती महागाई पाहता यावेळी आरबीआय आपल्या रेपो रेटमध्ये कपात करून सामान्यांना दिलासा देईल, अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र यावेळेस देखील कर्जदारांची निराशा झाली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, यावेळीही आरबीआयने रेपोरेट कायम ठेवला आहे. त्यामुळे सलग 11 व्यांदा आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तसेच आर्थिक विकास दर 6.6 टक्के राहण्याचा अंदाज आहे.

COMMENTS