Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उन्हाची तीव्रता; निसर्ग सौंदर्य आणि पशू-पक्ष्यांना जपा !

लातूर प्रतिनिधी - येथील वसुंधरा प्रतिष्ठानतर्फे पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी झाडांवर पाणपोयी सुरू करण्यात आली शिवाय, उन्हा

तलाठ्याच्या चुकीमुळे वृध्द निराधार महिलेचे झाले पैसे बंद
चोपडा तालुक्यातील वेले येथे ट्रकने घेतला अचानक पेट
चोपडा तालुक्यात वीज पडून शेतात दहा मेंढ्या च्या मृत्यू 16 वर्षाचा मुलगा जखमी.

लातूर प्रतिनिधी – येथील वसुंधरा प्रतिष्ठानतर्फे पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी झाडांवर पाणपोयी सुरू करण्यात आली शिवाय, उन्हाळ्यात झाडांची विशेष काळजी घेण्यासाठी झाडांना पाण्याच्या बाटल्या बांधून वृक्ष लागवड सोबतच संवर्धन काळाची गरज हा संदेश देण्यात आला.
लातुरातील एमआयडीसी भागातील मुलींचे निरीक्षण गृह (अनाथाश्रम) येथे हा उपक्रम राबविण्यात आला. मुलींचे निरीक्षण गृह येथे अधीक्षक सागर मलवाडे यांच्या पुढाकाराने सावित्रीबाई फुले उद्यान उभारण्यात आले आहे. या उद्यानात पक्ष्यांच्या पिण्याची व्यवस्था व्हावी यासाठी झाडांना पाण्याच्या येळण्या बांधण्यात आल्या. सध्या कडक उन्हाळा असून पक्षी आणि जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे, अशी माहिती वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. योगेश शर्मा यांनी दिली. या उपक्रमात वसुंधरा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अमोल स्वामी, संस्थापक सहसचिव अमर साखरे यांच्यासह निरीक्षण गृहातील मुली सहभागी झाल्या होत्या.उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात झाडांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने झाडांना पाण्याच्या बाटल्या बांधून वृक्ष संवर्धन केले जाते आहे. सकाळ-सायंकाळी फिरायला (वॉक) जाणा-यांनी सोबत जाताना पाण्याची बॉटल घेऊन जाऊन झाडांना पाणी द्यावे, असे आवाहन वसुंधरा प्रतिष्ठानने केले आहे. जस उन्हाळ्यात आपण गाडी सावलीखाली लावण्यासाठी जागा शोधतो त्या प्रमाणे वृक्ष संवर्धनासाठी पुढे यावे, असे आवाहन प्रतिष्ठानने केले आहे.

COMMENTS