Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अधिकार्‍यांकडून पत्रकाराला अपमानास्पद वागणूक

छायाचित्रणाची परवानगी मागितल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची धमकी

देवळाली प्रवरा ः नाशिक शिक्षक मतदान प्रक्रियेचे छायचित्रण करण्याची मतदान अधिकारी तथा उप जिल्हाधिकारी शाहुराव मोरे यांना परवानगी मागितली असता राहु

चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला मिळतोय जादा भाव
बैलगाडी शर्यतीला राज्यशासनाकडून पाठबळ मिळावे यासाठी प्रयत्न करणार – राज्यमंत्री कु.आदिती तटकरे
मुख्यमंत्र्यांनी सत्तेतील दोन्ही काँग्रेसच्या आमदार-खासदारांशीही संवाद करावा

देवळाली प्रवरा ः नाशिक शिक्षक मतदान प्रक्रियेचे छायचित्रण करण्याची मतदान अधिकारी तथा उप जिल्हाधिकारी शाहुराव मोरे यांना परवानगी मागितली असता राहुरीतील पत्रकाराला अपमानास्पद वागणूक देवून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत धक्काबुक्की केल्याच्या निषेधार्थ उप जिल्हाधिकारी शाहुराव मोरे यांचा जाहिर निषेध करुन खात्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी राहुरी तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन देवून मागणी करण्यात आली.
          6 जून 2024 रोजी शिक्षक मतदार संघाची मतदान प्रक्रिया पार पडली. राहुरी येथील तहसील कार्यालयाच्या एका हॉलमध्ये मतदान केंद्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दुपारी सुमारे दिड वाजे दरम्यान शहरातील  इलेक्ट्रॉनिक मिडियाचे पत्रकार मनोज साळवे यांनी मतदान प्रक्रियेची  बातमी घेण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांनी मतदानासाठी लागलेल्या रांगेचे चित्रीकरण घेतले. नंतर मतदान सुरु असलेल्या हॉलमध्ये गेले. आणि त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून असलेल्या अधिकार्‍यांना मतदानाची शूटिंग घेऊ का? अशी परवानगी मागितली. त्यावेळी निवडणूक आधिकारी तथा उप जिल्हाधिकारी मोरे  यांनी संबंधित पत्रकाराला धक्काबुक्की करीत बाहेर व्काढले. तुझ्या विरोधात गून्हा दाखल करण्याची धमकी दिली. अधिकार्‍यांकडून पत्रकारांना अशी अपमानास्पद वागणूक मिळत असेल तर ही अतिशय निंदनीय बाब आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो. पत्रकारांना अशी वागणूक मिळत असेल तर सामान्य नागरिकांना कशी वागणूक मिळत असेल हे यावरून स्पष्ट होते. या घटनेचा राहुरी तालूक्यातील सर्व इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मिडियाचे पत्रकार संबंधित अधिकारी व प्रशासनाचा तीव्र शब्दात जाहिर निषेध केला. तसेच  तहसीलदार नामदेव पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी पत्रकारांच्या वतीने संबंधित अधिकारी व प्रशासनाचा निषेध व्यक्त करीत उप जिल्हाधिकारी मोरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार निसारभाई सय्यद, आर आर जाधव, पञकार हल्ला कृती समितीचे समन्वयक राजेंद्र उंडे, कर्णा जाधव, अनिल कोळसे, रियाज देशमुख, विनीत धसाळ, रमेश खेमनर, बंडू म्हसे,श्रीकांत जाधव, ऋषी राऊत, आकाश येवले, सचिन पवार, नानासाहेब जोशी, आप्पासाहेब मकासरे, अशोक मंडलिक, मनोज साळवे, राजेंद्र पवार, राजेंद्र म्हसे, कृष्णा गायकवाड, सतीष फुलसौंदर, मीनाश पटेकर, शरद पाचारणे, देवराज मंन्तोडे आदिसह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.

COMMENTS