Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे निर्देश

राज्य सरकारचा निर्णय बदलापूर येथील ती संस्था आता प्रशासकाच्या ताब्यात

ठाणे ः बदलापूर येथील दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार झाल्यानंतर जनप्रक्षोभाचा उद्रेक झाला होता. संतप्त नागरिकांनी तब्बल 10 दहा मध्य रेल्वे रोकून ठ

जय मल्हार क्रांती संघटनेकडून आमदार पाचपुतेंचा सत्कार
चॅनलमधील पत्रकार मुली साडी का नाही नेसत ? – सुप्रिया सुळे
सुवेझमधील व्यापार कोंडीमुळे भारतीय कर्मचारी अडचणीत

ठाणे ः बदलापूर येथील दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार झाल्यानंतर जनप्रक्षोभाचा उद्रेक झाला होता. संतप्त नागरिकांनी तब्बल 10 दहा मध्य रेल्वे रोकून ठेवल्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला होता. याप्रकरणी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवल्यानंतर सरकारला जाग आल्याचे दिसत आहे. राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आता राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे निर्देश दिले आहेत. याच सोबत सर्व शाळांमध्ये विशाखा समिती स्थापन करण्यात येणार असल्याची देखील त्यांनी घोषणा केली आहे. सर्व शाळांमध्ये तक्रारपेटीची व्यवस्था करण्यात येणार असल्याची देखील त्यांनी माहिती दिली आहे. बुधवारी माध्यमांसमोर दीपक केसरकर यांनी परिपत्रक जाहीर केले आहे. या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व शाळा आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले असून, सुरक्षा रक्षक, सफाईगार, मदतनीस, स्कूलबसचे चालक इत्यादी व्यक्तींची शाळा व्यवस्थापनाकडून चारित्र्य पडताळणी अहवाल पोलिस यंत्रणेकडून प्राप्त करुन घेणे आवश्यक राहणार आहे. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना केसरकर म्हणाले की ही संस्था म्हणजे आदर्श शाळेचा ताबा आता प्रशासकांच्या ताब्यात जाणार आहे. प्रशासाकांविषयी बोलताना केसरकर म्हणाले, प्रशासक हे स्थानिक अधिकारी आहेत. कारण एखाद्या व्यक्तीला नियुक्त केले तर त्यात काही त्रुटी निघू शकतात. तसेच ही तातडीची बाब असल्याने तातडीने प्रशासक नेमले आहेत. परंतु, संस्थेला जर अपील करायचे असेल तर त्यांना ती मुभा देण्यात आली आहे. कुठल्याही शाळेवर प्रशासक नेमणे म्हणजे ही खूप मोठी शिक्षा असते, असेही केसरकर यावेळी म्हणाले. यासोबतच प्रत्येक शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यासोबतच शाळांमध्ये सीसीटीव्ही बंद असल्याचे आढळून आल्यास याची जबाबदारी शाळेची असणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. बदलापूर येथे झालेल्या घटनेत या शाळेत सीसीटीव्ही नसल्याचे निदर्शनास आले असल्याने दीपक केसरकरांनी हे तातडीचे निर्देश दिले आहेत.

शिपाई ते मुख्याध्यापकांची पोलिस पडताळणी होणार पश्‍चिम बंगालमधील कोलकत्यात महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येचा प्रकरणात देशभरात संतापाची लाट असतानाच महाराष्ट्रातील बदलापूरच्या या घटनेन त्यात भर घातलेय या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. दरम्यान या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थींनीच्या सुरक्षा विषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी शासन निर्णय जारी झाली आहे. राज्यातील शिपाई ते मुख्याध्यापक पोलीस पडताळणी होणार आहे. दरम्यान, सरकारी सर्व शाळांमध्ये आता सीसीटीव्ही बसवण्याचे काम प्रगतिपथावर असल्याची माहिती दीपक केसरकरांनी दिली आहे. 

COMMENTS