Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजलगाव शहर पोलीसां कडुन ट्रॅव्हल्स ची तपासणी

माजलगाव प्रतिनिधी - समृद्धी राष्ट्रीय महामार्ग वर ट्रॅव्हल (खाजगी बस)चा अपघातात झाला होता त्याचे खरे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही पण तशी दुर्द

शेततळ्यात पडून सासरा-सुनेचा दुर्दैवी मृत्यू
सोमनाथ सूर्यवंशीची पोलिसांनी केलेली हत्याच : खा. राहुल गांधी
वारीतील टेके पाटील ट्रस्टचे सामाजिक कार्य दिशादर्शक

माजलगाव प्रतिनिधी – समृद्धी राष्ट्रीय महामार्ग वर ट्रॅव्हल (खाजगी बस)चा अपघातात झाला होता त्याचे खरे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही पण तशी दुर्दैवी घटना माजलगाव शहरातुन पुणे,मुंबई, औरंगाबाद शहरात जाणार्‍या ट्रॅव्हल्स तांत्रिक कारणास्तव होऊ नये यासाठी माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोनि.शितल कुमार बल्लाळ यांनी सर्तकता दाखवून 8ट्रव्हल्स ची तपासणी शहर वाहतुक पोलीसांच्या माध्यमातुन 2जुलै रविवार रोजी केली आहे. माजलगाव शहरातुन मुंबई, पुणे,औरंगाबाद शहरात जाणार्‍या ट्रॅव्हल्स ची संख्या जवळपास 12-15एवढी असुन  यासाठी एजंट्स ,मालकांच्या शहरातील शासकिय विश्रामगृह रोडवर एजन्सीज चालु आहेत. त्या माध्यमातुन त्यांचा व्यवसाय जोमात आहे म्हणजे रापमं च्या बस भाड्या पेक्षा अधिक दिडपट तिकीट भाडे आकारण्याची मुभा असली तरीही त्या पेक्षा अधिक रक्कम संबंधीत एजन्सीचे दलाल प्रवाशांकडून घेतात याबाबत परिवहन अधिकारी अनभिज्ञ आहेत का असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे. यात औरंगाबाद येथे जाणार्‍या ट्रॅव्हल्स रापमंच्या बसेस पेक्षा कमी तिकीट भाडे घेतात असे असतांना पुणे,मुंबई ला जाणार्‍या ट्रॅव्हल्स उल्लिखित तिकीट भाडे घेतात. माजलगाव शहर पोलीसांनी केलेल्या तपासणीत चालक दारु पिलेला आहे का.?,टायर्स ची स्थिती,आरटीओ चा परवाना,वाहनाचे फिटनेस प्रमाणपञ. आणिबाणीचे वेळी प्रवाश्यांना बाहेर पडण्याचा मार्ग आहे का,आग विझविण्याची यंत्रणा या बाबत तपासणी करण्यात आली असे पोनि.बल्लाळ यांनी सांगितले. ट्रॅव्हल्स तपासणी मोहीमेत पोउपनि. संजय दाभाडे,पोहेकां. पाखरे,पोकां.अनिल कानडे,लखन गंगावणे यांचा समावेश होता.

COMMENTS