Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आठ वर्षांनंतर निकृष्ट रस्त्याची पाहणी म्हणजे पालकमंत्री संजय राठोड यांची नौटंकी  – संजय देशमुख

पालकमंत्री संजय राठोड(Sanjay Rathore) यांनी दुचाकीवरून जात निकृष्ट दर्जाच्या रस्त्याची पाहणी केली. आठ वर्षांनंतर निकृष्ट रस्त्याचा पालकमंत्री संज

चक्क..मुख्याध्यापकाने शिक्षकाचा चावला अंगठा | LOKNews24
गोळीबाराने तरुणाची मांडी रक्तबंबाळ, पाठीवर कटरने वार | LOKNews24
दागिने पॉलिश करून देण्याचा बनाव करून पाच तोळे सोने लंपास

पालकमंत्री संजय राठोड(Sanjay Rathore) यांनी दुचाकीवरून जात निकृष्ट दर्जाच्या रस्त्याची पाहणी केली. आठ वर्षांनंतर निकृष्ट रस्त्याचा पालकमंत्री संजय राठोड यांना पुळका आला, त्यांची ही पाहणी नौटंकी असल्याचा हल्लाबोल माजी राज्यमंत्री संजय देशमुख(Sanjay Deshmukh) यांनी चढवला.  काही दिवसा अगोदर पालकमंत्री संजय राठोड हे मुंबई येथील अधिकाऱ्यांना अतिशय निकृष्ट झालेल्या दारव्हा ते दिग्रस रस्त्याची पाहणी करतानाचा टू व्हीलर बाईकवर पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह अधिकारी यांचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता.  दिग्रस मतदारसंघातला रस्ता असून मागील सहा ते सात वर्षांमध्ये अनेक प्रवाशांचे अपघातामुळे निधन झाले. तर काही प्रवाशांचे हात पाय तुटले.  दारव्हा ते दिग्रस रस्त्याच्या बांधकामामध्ये जुन्या पुलावरच नवीन फुल दाखवून बांधकाम करण्यात आले आहे. या संपूर्ण रस्त्याची सखोल चौकशी होऊन कंत्राटदाराला सुद्धा काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी माजी मंत्री देशमुख यांनी केली.

COMMENTS