Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काकडे महाविद्यालयात अविष्कार संशोधन स्पर्धेत नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर

शेवगाव तालुका ः आबासाहेब काकडे बी. फार्मसी महाविद्यालय बोधेगाव येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संशोधन विभागांतर्गत महाविद्यालयीन स्तरावर अवि

शैनेश्वर देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी जी.के.दरंदले
कोपरगावात रविवारी चैत्रोत्सवाचे आयोजन
कोरेगावमध्ये शाळकरी मुलींना सायकल वाटप

शेवगाव तालुका ः आबासाहेब काकडे बी. फार्मसी महाविद्यालय बोधेगाव येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संशोधन विभागांतर्गत महाविद्यालयीन स्तरावर अविष्कार संशोधन व पोस्टर  प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन 25 सप्टेंबर 2024 रोजी करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अँड. डॉ. शिवाजीराव काकडे उपस्थित होते.  अविष्कार संशोधन सारख्या स्पर्धेचा मोठा उपयोग विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी व विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढवण्यासाठी तसेच त्यांच्या कल्पकतेला चालना मिळवण्यासाठी होणार आहे अशी माहिती काकडे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनाद्वारे दिली.
 या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी विविध नाविन्यपूर्ण व कल्पक संकल्पना द्वारे संशोधनाचे सादरीकरण पोस्टर द्वारे केले. त्यापैकी विविध श्रेणी मधून उत्कृष्ट चार पोस्टरची निवड करण्यात आली. त्यामध्ये प्रथम क्रमांक कु.दौंड तृप्ती व दौंड प्रभंजन व खोसे आरती व अनाप साक्षी ,द्वितीय क्रमांक देशमुख सायली तसेच तांबे अभिषेक, पठाण सानिया व पाठे रीचा यांची तृतीय क्रमांकासह विभागीय स्पर्धेकरिता निवड करण्यात आली.या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून मुळा एज्युकेशन सोसायटी सोनई येथील फार्मसी कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. विलास घावटे सर व एन एन सथा बी. फार्मसी कॉलेज अहमदनगर येथील विभाग प्रमुख डॉ. माधुरी देशमुख यांनी केले. अविष्कार संशोधन कार्यक्रमाचे आयोजन  प्राध्यापक सोमनाथ डावखर यांनी केले होते तसेच सूत्रसंचालन शरयू भोसले व जायगुडे वैष्णवी यांनी केले व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत गांगुर्डे यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक सोमनाथ डावखर यांनी केले.विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे  आदरणीय हर्षदा ताई काकडे मा. सभापती महिला व बालकल्याण विभाग अहमदनगर तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय प्रा. लक्ष्मणराव बिटाळ सर व समन्वयक प्रा. संपतराव दसपुते यांनी अभिनंदन व कौतुक केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS