Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांवर अन्याय

आमदार आशुतोष काळेंची विधानसभेत लक्षवेधी

कोपरगाव प्रतिनिधी : चालू वर्षी अतिशय कमी पर्जन्यमान झाल्यामुळे गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात दुष्काळी परिस्थिती असतांनाही परत एकदा समन्यायी पा

 कालव्या लगतच्या रोहीत्रांचा वीजपुरवठा सुरु करा
नवीन तलाठी कार्यालयांचे प्रस्ताव तयार करा
उर्वरित शेतकर्‍यांना तातडीने अग्रीम पिकविम्याची रक्कम द्या

कोपरगाव प्रतिनिधी : चालू वर्षी अतिशय कमी पर्जन्यमान झाल्यामुळे गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात दुष्काळी परिस्थिती असतांनाही परत एकदा समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या आधारे नगर-नासिकच्या धरणातून खाली पाणी सोडण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा शासनाकडून गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांवर अन्याय झाला असून शासन कोणतेही असो गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांवर अन्यायच होत आला आहे याकडे आ. आशुतोष काळे यांनी विधानसभेचे लक्ष वेधून समन्यायी पाणी वाटप कायद्यामध्ये बदल करून गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकर्‍यांवर सातत्याने होणारा अन्याय दूर करावा अशी मागणी हिवाळी अधिवेशनात सोमवार (दि.18) रोजी केली.
हिवाळी अधिवेशनात आ. आशुतोष काळे यांनी गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांवर होत असलेल्या अन्यायाकडे सभागृहाचे लक्ष वेधतांना त्यांनी सांगितले की, कोपरगाव विधानसभा मतदारसंघांतील गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील नाशिक जिल्ह्यातील निफाड,सिन्नर, येवला आणि नगर जिल्ह्यातील राहाता, श्रीरामपूर या तालुक्याच्या शेतकर्‍यांना मागील शंभरपेक्षा जास्त वर्षापासून गोदावरी कालव्याच्या माध्यमातून सिंचनासाठी पाणी मिळते. सुरुवातीला सिंचनासाठी बारमाही पद्धतीने पाणी मिळत असल्यामुळे शेतकर्‍यांना ब्लॉक देण्यात आले. त्या नंतर या ब्लॉकच्या संख्येत कपात करून हे ब्लॉक पन्नास टक्के रद्द करण्यात आले आणि आता पूर्णपणे ब्लॉक नुतनीकरण करण्यासाठी थांबवले आहे.अशा परिस्थितीत चालूवर्षी सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असतांना देखील नगर-नाशिकच्या वरच्या धरणातून खालच्या धरणात पाणी सोडून पुन्हा अन्याय करण्यात आला आहे. मागील चार वर्ष 2019 ते 23 पर्यत गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात समाधानकारक पर्जन्यमान होत असल्यामुळे सर्वत्र मुबलक पाणी होते. नगर-नाशिकच्या वरच्या धरणांमध्ये व खालच्या धरणांमध्ये देखील मुबलक पाणी साठा असल्यामुळे पाण्याची अडचण भासली नाही परंतु यावर्षी अतिशय कमी पर्जन्यमान झाल्यामुळे संपूर्ण मतदार संघात दुष्काळी परिस्थिती होती. अशीच परिस्थिती नाशिकच्या धरणक्षेत्र परिसरामध्ये असल्यामुळे एकवेळ धरणे भरतात का नाही? अशी परिस्थिती निर्माण झाली होती.परंतु त्यानंतर धरणक्षेत्र परिसरामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे धरणे शंभर टक्के भरली गेली. मात्र खालच्या धरणांमध्ये पाणी नसल्यामुळे समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या आधार घेवून वरच्या धरणातील पाणी खाली सोडण्यात येवून गोदावरी कालव्याच्या लाभ धारक क्षेत्रातील शेतकर्‍यांवर पुन्हा एकदा अन्याय झाल्याचे आमदार काळे यांनी म्हटले आहे.

COMMENTS