Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अपघाती मृत्यू नियंत्रणात आणण्यासाठी पुढाकार घ्यावा : -जिल्हाधिकारी कटियार

अमरावती : रस्ते अपघातामध्ये वेळेवर वैद्यकीय मदत मिळावी, यासोबतच रस्ता सुरक्षेमध्ये सर्व यंत्रणांनी अपघाती मृत्यू नियंत्रणात आणण्यासाठी पुढाकार घ्

सिंहगडावर सापडले प्राचीन पटखेळांचे अवशेष
काय वाढीव धुतलंय पोरीने या पोरांना…एकच नंबर ! | LOK News 24
शिवतारे भाजपच्या कमळ चिन्हावरही लढण्यास तयार

अमरावती : रस्ते अपघातामध्ये वेळेवर वैद्यकीय मदत मिळावी, यासोबतच रस्ता सुरक्षेमध्ये सर्व यंत्रणांनी अपघाती मृत्यू नियंत्रणात आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी कार्यकारी अभियंता रूपा गिरासे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. डी. के. सौंदळे, उपायुक्त गणेश शिंदे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले, सुरक्षित वाहतुकीसाठी शासनाकडून निधी प्राप्त होत आहे. त्यामुळे या निधीचा चांगला विनियोग होणे गरजेचे आहे. प्रामुख्याने आतापर्यंत रस्ता सुरक्षा अंतर्गत सुचविण्यात आलेल्या सुधारणा प्रत्येक विभागाने प्राधान्याने पूर्ण कराव्यात. याचा अहवाल तातडीने देण्यात यावा. यासोबतच अपघाताची शक्यता असलेल्या ठिकाणांचा शोध घेण्यात यावा. यावर आपल्या स्तरावर उपाययोजना कराव्यात. आवश्यकता भासल्यास जिल्हा प्रशासनही मदत करेल. अपघात घडल्यास जखमींना तातडीने मदत पोहोचले यासाठी प्रयत्न करण्यात यावे. तसेच रूग्णालये आणि पोलिसांच्या मदत क्रमांकाचे फलक लावण्यात यावे.

गेल्या वर्षात ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरी भागात रस्ता सुरक्षा राबविण्यावर भर द्यावा लागणार आहे. तसेच अपघातातील जखमींना तातडीने औषधोपचार मिळणे गरजेचे आहे. यासाठी पोलिसांनी योग्य ती पावले उचलावीत. पोलिसांनी परिवहन विभागाला अपघाताची माहिती द्यावी, यामुळे अपघाताची कारणे आणि त्यावर करावयाच्या उपायोजनांबाबत संबंधित यंत्रणांना कार्य करता येईल. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासोबतच अपघातातील जखमींना मदत आणि अपघातावरील उपाययोजना करण्यावर यंत्रणांनी भर द्यावा. यामुळे अपघाती मृत्यूची संख्या कमी होण्यास मदत मिळेल.

रस्ता सुरक्षा अभियानांर्गत हेल्मेटबाबत जनजागृतीसाठी हेल्मेट रॅली काढण्यात आली. बैठकीपूर्वी जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवली. रस्ता अपघातामध्ये शहरी भागात मृत्यू अधिक होत असल्यामुळे नागरिकांनी हेल्मेटचा उपयोग करावा, असे आवाहन केले. ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयातून निघून गर्ल्स हायस्कूल, बसस्थानक, रेल्वे स्टेशन चौक, राजकमल, राजापेठ जयस्तंभ मार्गे निघून शहर वाहतूक शाखा येथे समारोप झाला. प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी अनिल मानकर यांनी सूत्रसंचालन केले.

COMMENTS