कोचिंग क्लासमधील शिक्षकाकडून विद्यार्थ्याला अमानुष मारहाण.

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

कोचिंग क्लासमधील शिक्षकाकडून विद्यार्थ्याला अमानुष मारहाण.

घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल

कोचिंग क्लासमध्ये एका विद्यार्थ्याला शिक्षकानं अमानुष मारहाण केली. ही मारहाण इतकी संतापजनक होती, की या घटनेचा व्हिडीओ समोर आ

कर्मचारी कपातीवरुन अ‍ॅमेझानला घेरले
लोकशाहीचा उत्सव आणि मूल्ये
कर्जफेड करणाऱ्या राज्यातील २० लाख शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान

कोचिंग क्लासमध्ये एका विद्यार्थ्याला शिक्षकानं अमानुष मारहाण केली. ही मारहाण इतकी संतापजनक होती, की या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर गावातल्या लोकांनी कोचिंग क्लासमधील शिक्षकालाच नंतर मारहाण केली.हि धक्कादायक घटना बिहारच्या (Bihar) पाटनामधील धनरुआ (Dhanrua) मध्ये घडली आहे .कोचिंग क्लासमध्ये एका वर्गात हा शिक्षक इतर मुलाच्या देखत एका पाच वर्षांच्या चिमुरड्याला अमानुष मारहाण करताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे . 

शिक्षकाचे फटके खात असताना हा विद्यार्थी कळवळत होता .लाकडाच्या फळीचे एकामागोमाग एक फटके या शिक्षकाने विद्यार्थ्याच्या पार्श्वभागावर लगावले . इतकाच काय तर नंतर काठी ठेवून हाताने मुलाच्या कानशिलातही शिक्षकाने लगावली त्याने हा विद्यार्थी फरशीवर कोसळला. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

COMMENTS