महागाईने सर्वसामान्यांची होरपळ

Homeताज्या बातम्यादेश

महागाईने सर्वसामान्यांची होरपळ

महागाई दर 14.55 टक्क्यांवर

नवी दिल्ली/प्रतिनिधी : देशात भोंग्याचे राजकारण, दिल्लीत हनुमान जयंतीच्या दिवशी शोभायात्रेवर दगडफेक करीत झालेला हिंसाचार ताजा असतानांच दुसरीकडे सर्वसा

भारताला धक्का! कुस्ती महासंघाचे सदस्यत्व रद्द
नगर जिल्ह्यात देशाला हादरून टाकणारा भ्रष्टाचार
 कापसाचे दर वाढवण्यात यावे; शेतकऱ्यांची प्रशासनाला मागणी

नवी दिल्ली/प्रतिनिधी : देशात भोंग्याचे राजकारण, दिल्लीत हनुमान जयंतीच्या दिवशी शोभायात्रेवर दगडफेक करीत झालेला हिंसाचार ताजा असतानांच दुसरीकडे सर्वसामान्यांचे रोजच्या जगण्यांचे प्रश्‍न अजूनही अनुत्तरितच असल्याचे दिसून येत आहे. इंधन दरवाढ, खाद्यतेलांचे वाढणारे भाव यासह जीवनावश्यक वस्तूंचे भाव मोठया प्रमाणावर वाढल्यामुळे सर्वसामान्यांची होरपळ वाढतांना दिसून येत आहे.
मार्च महिन्यातील सर्वसाधारण महागाई निर्देशांक (डब्ल्यूपीआय) 14.55 टक्क्यांवर गेला आहे. महागाई दराचा हा गेल्या चार महिन्यातील उच्चांकी स्तर आहे. महागाईमुळे बहुतांश वस्तुंचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. महागाईमुळे होत असलेली होरपळ कधी थांबणार? असाच सवाल सध्या जनतेमधून केला जात आहे.
विशेषतः कच्चे तेल, नैसर्गिक वायू, मिनरल ऑईल, बेसिक मेटल आदी वस्तुंच्या दरात सदर कालावधीत वाढ झाल्याचे अर्थ मंत्रालयाचे म्हणणे आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यान सुरु असलेल्या युध्दामुळे कच्चे तेल महागले आहे. तर युध्द आणि कोरोनामुळे पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. मासिक तत्वावर मार्चमध्ये इंधन आणि ऊर्जा श्रेणीच्या निर्देशांकात 5.68 टक्क्याने वाढ झाली आहे. निर्मिती क्षेत्रातील वस्तुंचा निर्देशांक 2.31 टक्क्यांनी वाढला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीत महागाईचा दर 13.11 टक्के इतका होता तर जानेवारीत 12.96 टक्के महागाई दर होता. मूल्यांकनाच्या आधारे महागाई दर वाढल्याने त्याचा फटका सर्वसामान्य लोकांच्या जीवनावर होत असतो कारण लोकांना लागणार्‍या जीवनावश्यक वस्तूंच्या दरात ही वाढ होऊन वस्तू महाग होतात. डब्ल्यूपीआयचा अर्थ होलसेल प्राइस इंडेक्स आहे. याठिकाणी मालाच्या किंमतीचे दर कळतात. मार्च महिन्यात खाण्या-पिण्याच्या वस्तूंची घाऊक महागाई दर 8.47 टक्क्यांवरून 8.71 टक्के इतका झाला आहे. इंधन आणि वीज महागाई दर 31.50 टक्क्यांवरून 34.52 टक्क्यांवर पोहचला आहे. बटाट्याचे घाऊक दरातही वाढ झाल्याचं दिसून येते. बटाट्याचा दर 14.78 टक्क्यांवरून 24.62 टक्के वाढला आहे. कांद्याचे घाऊक दर 26.37 टक्क्यांवरून जास्त झाला आहे. अंडी, मांसाहार दर 8.14 टक्क्यांवरून 9.24 टक्के इतका झाला आहे. गेल्या 4 महिन्यात क्रूड ऑयलचे आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. मार्च महिन्यात किरकोळ महागाई दर 6.95 टक्क्यांवर पोहचला आहे. 17 महिन्यांतला हा सर्वाधिक दर आहे. फेब्रुवारी महिन्यात किरकोळ महागाई दर 6.07 टक्के इतका होता. खाण्या-पिण्याच्या वस्तू महागल्याने गृहणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

…तर भारताची अवस्था श्रीलंकेसारखी होईल : चव्हाण
भारतीय अर्थव्यवस्थेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे असणारे नियंत्रण सुटले असून, त्यांच्या चुकीच्या धोरणामुळेच जनतेला महागाईचे चटके बसत असल्याचा गंभीर आरोप काँगे्रस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. वेळीच योग्य निर्णय घेऊन अर्थव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न झाला नाही तर भारताची अवस्था शेजारच्या श्रीलंका देशासारखी होईल, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. देशात आज कमालीची महागाई वाढली आहे. रोज पेट्रोल-डिझेल, गॅसच्या किंमती वाढत आहेत. सर्वसामान्य जनतेचे जगणे हैराण झाले आहे. मोदी सरकार विरोधात जनतेत कमालीचा रोष वाढत असल्याचे देखील चव्हाण यांनी निर्दशनास आणून दिले.

COMMENTS