Homeताज्या बातम्यासंपादकीय

विदेशात घुसखोरी आणि स्थलांतर! 

भारतातून विदेशात आणि खासकरुन अमेरिकेत स्थलांतर करणाऱ्या भारतीयांची संख्या आता पाचपट झाली आहे. खासकरुन गुजरात आणि पंजाब मधून अमेरिकेत बेकायदेशीररि

बंदिस्त मनाचा खुला वर्ग !
सरन्यायाधीश ट्रोल होतात तेव्हा……..!
खेळभावनेची जागा हिंसाचाराने घेतलीय का ?

भारतातून विदेशात आणि खासकरुन अमेरिकेत स्थलांतर करणाऱ्या भारतीयांची संख्या आता पाचपट झाली आहे. खासकरुन गुजरात आणि पंजाब मधून अमेरिकेत बेकायदेशीररित्या घुसखोरी करण्याचे प्रमाणही वाढले आहे. यावर्षी कॅनडा आणि मेक्सिको च्या सीमेवरून अमेरिकेत घुसू पाहणाऱ्यांमध्ये जे पकडले गेले त्यांची संख्या ९७ हजारपेक्षा अधिक आहे.

 भारतातील संपत्ती लुटून विदेशात स्थायिक होण्याचे सत्र सन २०२३ या वर्षातही भारतातून सुरूच राहिले आहे, असा रिपोर्ट नुकताच प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट म्हणून हेनलेचा वार्षिक अहवाल प्रसिद्ध झाला आहे, त्यात ही बाब नमूद करण्यात आली आहे. भारतातून ६५०० श्रीमंत हे विदेशात स्थलांतरित झाले असून, यातील बहुतांश श्रीमंत हे दुबई आणि सिंगापूर या दोन देशांमध्ये स्थलांतर झाले आहेत. हेनले ने दिलेल्या या वार्षिक अहवालात ज्या देशांमधून मोठ्या प्रमाणात मायग्रेशन किंवा स्थलांतर झाले आहे, त्यातील सर्वात जास्त म्हणजे १३,५०० लोक हे चीन मधून जगातल्या इतर देशांमध्ये स्थलांतरित झाले आहेत. अर्थात, चीन मधून स्थलांतर होण्याचे मुख्य कारण म्हणजे तेथे लोकशाही नसल्याचं सर्वात मोठे द्योतक असून, त्या ठिकाणी स्वातंत्र्याचा अभाव ही बाब या श्रीमंतांना खटकणारी आहे; त्यामुळे हे स्थलांतर झाले आहे. दुसऱ्या क्रमांकावर अर्थातच भारत आहे, आणि या यादीत तिसऱ्या क्रमांकावर युनायटेड किंग्डम म्हणजे ब्रिटन या देशाचा नंबर आहे. ब्रिटनमधून ३२०० लोक हे अन्य देशात स्थलांतरित झाले आहेत. अर्थात, हे स्थलांतरित होणारे लोक, हे त्या त्या देशातील अब्जाधीश आहेत, ही बाब या ठिकाणी महत्वपूर्ण आहे. या अहवालात भारतीय श्रीमंत हे एवढ्या मोठ्या प्रमाणात स्थलांतरित का होत आहेत, या संबंधातली कारण मीमांसा देताना या अहवालात म्हटले आहे की, कर बुडवून ज्या देशात कर लागू नाहीत अशा देशात स्थलांतरित होण्याची मानसिकता यामागे प्रामुख्याने आहे. दुबई सारख्या देशांमध्ये कर प्रणाली लागू नसल्यामुळे या भारतीय श्रीमंतांचा ओढा दुबईमध्ये स्थायिक होण्यासाठी अधिक प्राधान्य देणारा आहे. शिवाय दुबई सारख्या देशातून केवळ तीन तासात भारतात ये-जा करता येते आणि वरच्यावर जेणेकरून भारत आणि आपण स्थलांतरित होत असलेल्या देशांमध्ये कमीत कमी अंतर ठेवून वरच्यावर आपलं जाणे-येणं कसं होईल, ही देखील सोय या स्थलांतरामध्ये पाहिली गेली आहे, असे अहवालात नमूद केले आहे. यूएई सरकारचा कर पर्यावरणाचा भाग हा भारतीयांना दुबईत स्थायिक होण्यासाठी अधिक आकर्षक भाग राहिला आहे, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या अहवालात इतर देशातून जे काही नागरिक स्थलांतरित झाले आहेत, त्यांची देखील आकडेवारी आलेली आहे.  त्यामध्ये रशिया या देशातून यावर्षी जवळपास तीन हजार अब्जाधीश हे स्थलांतरित झाले आहेत, तर ब्राझीलमधून बाराशे, हाँगकाँग मधून १००० आणि दक्षिण कोरिया मधून ८०० तर मेक्सिको या देशातून सातशे धनाढ्य स्थलांतरित झाले, तर, दक्षिण आफ्रिका मधून ५०० आणि जपानमधून ३०० नागरिक स्थलांतरित झाले आहेत. स्थलांतरित होणारे हे सर्व नागरिक त्या त्या देशातील अब्जाधीश आहेत,  धनाढ्य आहेत. त्यामुळे त्यांच्या स्थलांतरिताची कारणे वेगवेगळी असली, तरी एक साम्य त्यामध्ये आहे की, आपली संपत्ती, टॅक्स आणि इतर संकटांपासून वाचवणं, हेच या श्रीमंतांचे उद्देश आहेत. त्यामुळे ते आपल्या मूळ भूमीपासून जगातल्या इतर देशात स्थायिक होण्यासाठी निघाले आहेत. कोणत्या देशातून किती श्रीमंत स्थलांतरित किंवा परांगदा झाले, याबरोबरच हे जगातील वेगवेगळ्या देशांमधून स्थलांतरित होणारे  अब्जाधीश नेमके कोणत्या देशांमध्ये किती संख्येने स्थलांतरित झाले आहेत, याची देखील आकडेवारी या अहवालात नमूद करण्यात आली आहे. या अहवालानुसार ऑस्ट्रेलियामध्ये ५२०० अब्जाधीश स्थायिक झाले आहेत, तर, दुबईमध्ये ४५०० नागरिक जगभरातून येऊन स्थायिक झाले आहेत, तर सिंगापूर मध्ये ३२०० नागरिक हे स्थायिक होण्यासाठी दाखल झाले आहेत.  अमेरिकेमध्ये २१०० स्वित्झरलँड मध्ये १८०० आणि कॅनडामध्ये सोळाशे तर ग्रीस आणि फ्रान्समध्ये अनुक्रमे बाराशे आणि हजार विदेशी स्थायिक होत आहेत. तर, पोर्तुगाल मध्ये जवळपास ८०० विदेशी स्थायिक होण्यासाठी गेले आहेत, असा हा अहवाल आपली आकडेवारी सांगतो. या आकडेवारीनुसार त्या त्या देशातील नागरिक हे आपला पैसा वाचवून आपल्या देशाला व आपल्या देशाच्या नागरिकांपासून पोबारा करून निघाले आहेत, ही मात्र यातील सर्वात सत्य अशी मेख आहे!

COMMENTS