Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रुईगव्हाणच्या सरपंचपदी इंदिरा निलेश पवार बिनविरोध

कर्जत ः कर्जत तालुक्यातील रुईगव्हाण येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदी इंदिरा निलेश पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. अश्‍विनी जामदार यांचा सरपंचपदा

मनपा पतसंस्था व झेडपी सोसायटी निवडणुकीत जोरदार शक्तीप्रदर्शन
लक्ष्मीनगरच्या नागरिकांना उतारे मिळण्यासाठी कार्यवाही करा
डॉ. तनपुरे कारखान्याच्या मालमत्तेची किंमत ठरणार ?

कर्जत ः कर्जत तालुक्यातील रुईगव्हाण येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदी इंदिरा निलेश पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. अश्‍विनी जामदार यांचा सरपंचपदाचा दीड वर्षाचा कार्यकाल संपल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. निवड प्रक्रियेमध्ये दरम्यान पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे सरपंच म्हणून इंदिरा पवार यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी. उपसरपंच मालन काळे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश रजपुत, रोहीणी पवार, आप्पा पवार, मंगल टुले उपस्थित होते.निवडणूक निर्णय आधिकारी म्हणून तनपुरे व ग्रामसेवक जालिंदर मुळे यांनी काम पाहिले. निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच इंदिरा पवार यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच अशोक पवार, नरसिंग पवार, शिवाजी जामदार, सुनिल पवार, प्रकाश जामदार, प्रकाश पवार, निलेश पवार, बारकु काळे, बापु नाव्हले, सचिन पवार, शिवाजी पवार, सतिष जामदार, योगेश जामदार, बाळु जामदार, राजेंद्र रजपुत, भाऊ सांगळे, यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS