श्रीगोंदा : तालुक्यातील इंदिरा गांधी विद्या निकेतन श्रीगोंदा फॅक्टरी या विद्यालयात इ.10वी च्या मार्च 2001 च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा
श्रीगोंदा : तालुक्यातील इंदिरा गांधी विद्या निकेतन श्रीगोंदा फॅक्टरी या विद्यालयात इ.10वी च्या मार्च 2001 च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी विद्यार्थी जुन्या आठवणीत रममान होऊन गेले होते. अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक आर. के. लगड होते. लहानपणी एकाच बाकावर बसून शिक्षण पुर्ण केले. आपले मित्र-सवंगडी यांना 25 वर्षानंतर भेटल्यानंतर माजी विद्यार्थी भारावून गेले होते. व मनमोकळेपणाने गप्पा मारत होते. जुन्या आठवणींना उजाळा देत काहींचे डोळे पाणवले होते.
यावेळी या मेळाव्यात माजी शिक्षक उपस्थित होते. त्यांना व्यासपीठावर पाहून विद्यार्थ्यांचे मन हेलावून गेले. शिक्षकांनी आम्हाला शिकवलं वेळप्रसंगी शिक्षा केली. त्यामुळे आम्ही घडलो व आज चांगल्या पदावर आम्ही काम करत आहोत. अशी प्रतिक्रिया यावेळी माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. या शाळेला व शिक्षकांना आम्ही कधी विसरू शकत नाही अशी भावना त्यांनी आवर्जून व्यक्त केली. यावेळी माजी विद्यार्थी व शिक्षकांनी मनोगत व्यक्त केली. या माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी कृतज्ञ भावनेतून 500 लिटर पाणी क्षमतेचा एक आर.ओ. फिल्टर शाळेसाठी भेट दिला व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी गवळी यांनी माजी विद्यार्थी व माजी शिक्षक यांच्याशी संपर्क करून हा कार्यक्रम घडून आणला. कार्यक्रमाची सांगता स्नेह भोजनाने झाली. या मेळाव्यात बाळासाहेब शेंडे, भगवानराव आरडे, अंकुश वाघ, दादासाहेब घोंडगे, जिजाबाई कापरे, उषाताई शेजुळ, श्रीमती झेंडे मॅडम, सदाशीव राजेभोसले, खानसाब सय्यद, शहाजीराव कोकाटे, भाऊसाहेब वाघ, रामदास चौगुले हे माजी शिक्षक उपस्थित होते. तसेच माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन जितेंद्र रणसिंग व वर्षा अरविंद पवार यांनी केले. तर आभार मेजर ताराचंद सुडगे यांनी मानले.
COMMENTS