Homeताज्या बातम्यासंपादकीय

भारताचा विजयी ‘षटकार’

सध्या विश्‍वचषकाची धामधूम सुरू असून, या स्पर्धेत भारतीय संघाने सलग सहा सामने जिंकत आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने घेतलेली आघाडी चाहत्यांना नक्कीच

सरकारी निर्णय राज्यास मारक
पोलिस भरती आणि पावसाळा
कलचाचण्यांचा निष्कर्ष

सध्या विश्‍वचषकाची धामधूम सुरू असून, या स्पर्धेत भारतीय संघाने सलग सहा सामने जिंकत आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने घेतलेली आघाडी चाहत्यांना नक्कीच सुखावणारी आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे भारतीय संघाचा असलेला समतोल. संघ तेव्हाच विजयी होतो, जेव्हा तो अडचणीत असतो, तेव्हा इतर खेळाडू आपले काम चोखपणे बजावतात. त्यामुळेस संघ विजयी होतो. प्रत्येक खेळाडू जबाबदारीने खेळतांना दिसून येत आहे. एकाने चूक केली म्हणजे, दुसरा खेळाडू चुक करतो असे नाही, तर तो खेळाडू ती चुक सुधारून संघाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतांना दिसून येतो, त्यामुळे भारतीय संघ विश्‍वचषकाचा प्रमुख दावेदार समजला जातो. या विश्‍वचषक स्पर्धेत अनेक उलटफेर बघायला मिळाले. गतवर्षीचा विश्‍वचषक संघ असलेला इंग्लंड यंदा उपांत्य फेरी देखील गाठू शकला नाही, सलग चार पराभव या संघाला बघायला मिळाले. सहा सामन्यात भारतासमोर खरे आव्हान न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघाचे होते. मात्र या तिन्ही संघावर भारताने मात दिली आहे. खरंतर विजयाची भूक, विजयाची तीव्र इच्छा आतून असावी लागते. तुमची विजयाची भूक जीतकी, तीव्र असेल, तितका तुम्हाला विजय लवकर मिळतो, आणि हेच गणित भारतीय संघाच्या बाबतीत तंतोतत लागू पडतो. सलग पाच सामने जिंकूनही भारताने सहाव्या सामन्यात हारागिरी पत्करली नाही. सुरूवातीला भारताने चार विकेट लवकर गमावल्यानंतरही कर्णधार रोहित शर्मा मैदानावर तग धरून राहिला. त्याचे शतक थोडक्यात हुकले असले तरी, त्याने आपले काम चोख बजावले. तरीदेखील या मैदानावर 30-40 धावा भारतीय संघाने कमी केल्या, याची कबुलीच खुद्द रोहित शर्माने दिली आहे. भारताने कमी रन जरी केले असले तरी, भारताने मनात जिंकण्याच्या इर्ष्येनेच मैदानात उतरला होता. आणि भारतीय गोलदांजानी कर्णधाराचा विश्‍वास सार्थ ठरवत, हा विजय मिळवून दिला. त्यामुळे कोणत्याही प्रकारात खेळण्यात आम्ही समर्थ असल्याचाच संदेश भारताने आपल्या खेळीतून दिला आहे. खरंतर भारतीय संघाने किकेटला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. भारताची फलंदाजी ही इतर संघापेक्षा एक खूप आक्रमक आहे. ज्या पद्धतीने भारतीय ओपनर रोहित शर्मा आणि शुबमन गिल, पहिल्या बॉलपासून समोरच्या गोलदांजाची धुलाई करतात, त्यानंतर खेळास येणार्‍या कोणत्याच फलंदाजावर गोलदांजाचे वर्चस्व राहत नाही. हीच रणनीती भारतीय संघ सुरूवातीपासून आखतांना दिसून येत आहे. त्याचबरोबर मैदानात उतरण्यापूर्वी समोरच्या संघाचा अभ्यास महत्वाचा असतो. त्यांचे स्ट्राँग पॉईंटस, त्यांचे विकनेस माहित करून घेण्यासाठी अभ्यास करावा लागतो, चाणाक्ष नजरेतून जुन्या मॅचेस बघाव्या लागतात, आणि हाच अभ्यास भारतीय संघ बारकाईने करतांना दिसून येत आहे. त्यामुळे परिस्थितीत कोणतीही असली तरी, त्यावर मात देण्याचे गुण भारतीय संघाजवळ असल्याचे दिसून येतात. ज्या पद्धतीने टीम इंडियाची गोलंदाजी आहे त्यातून एक कळते की, दव असो या कमी धावसंख्या रोखायची असो, एक सक्षम गोलंदाजीचा ताफा रोहितकडे आहे. हार्दिक पंडया दुखापतीमुळे बाहेर गेल्यामुळे भारतीय संघ कमजोर होईल अशी अपेक्षा होती. मात्र ज्यापद्धतीने मोहम्मद शमी गोलदांजी करतांना दिसून येत आहे, त्यावरून पंडयाची कमी भारतीय संघाला अजिबात जाणवत नसल्याचे दिसून येत आहे. शमीने दोन्ही सामन्याच अचूक गोलदांजी करून आपण भारतीय संघाचे हुकमी अस्त्र असल्याचे दाखवून दिले आहे. इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात पहिल्यांदाच भारताने या विश्‍वचषकात धावांचे रक्षण केले. त्यामुळे मी टीम इंडिया 2011 च्या विश्‍वचषकाची पुनरावृत्ती करणार, यात आश्‍चर्य नाही. 

COMMENTS