नवी दिल्ली :लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी, जिनेव्हा येथे 13 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर 2024 या कालावधीत झालेल्या 149 व्या आंतर-संसदीय संघ (आयपीयु)

नवी दिल्ली :लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी, जिनेव्हा येथे 13 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर 2024 या कालावधीत झालेल्या 149 व्या आंतर-संसदीय संघ (आयपीयु) सभेमध्ये संसदीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. अधिक शांततापूर्ण आणि शाश्वत भविष्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाचा आधार या संकल्पनेवरील सभेला संबोधित करताना ओम बिर्ला यांनी बहुपक्षीयतेसाठी असलेली भारताची वचनबद्धता आणि जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी संसदीय संवादाचे महत्त्व अधोरेखित केले.
विज्ञान आणि तंत्रज्ञानापासून मिळणार्या लाभांच्या न्याय्य वाटपाच्या गरजेवर त्यांनी भर दिला,आणि सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी परस्परांच्या संसदेमधील सहयोगी प्रयत्नांचा पुरस्कार केला. लवचिक भविष्य घडवण्यासाठी तंत्रज्ञानातील प्रगती आणि नवोन्मेषी दृष्टिकोन आवश्यक असल्याचे ओम बिर्ला यांनी अधोरेखित केले.ही सभा, केवळ भारताच्या संसदीय मुत्सद्देगिरीची ताकद अधोरेखित करत नसून, सामायिक जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेल्या जागतिक संवादामधील भारताची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करत असल्याचे त्यांनी नमूद केले. या सभेत तातडीच्या विषयावरील ठराव मंजूर करण्यात आला. जागतिक शांतता, न्याय आणि शाश्वतता, यासाठी बहुपक्षीयतेप्रति पुन्हा वचनबद्ध होण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांनी केलेल्या तातडीच्या याचिकेला संसद सदस्यांनी दिलेला प्रतिसाद, असे या ठरावाचे शीर्षक होते. उल्लेखनीय बाब म्हणजे, शांतता आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा, शाश्वत विकास, लोकशाही आणि मानवाधिकार आणि संयुक्त राष्ट्र व्यवहार, या मुद्द्यांना संबोधित करणार्या आयपीयुच्या चार स्थायी समित्यांचे अहवाल देखील यावेळी स्वीकारण्यात आले. आयपीयुमध्ये 180 सदस्य असलेल्या संसद आणि 15 सहयोगी सदस्य आहेत. सदस्यांमध्ये चीन, भारत आणि इंडोनेशिया यासारख्या मोठ्या देशांची संसद, तसेच काबो वर्दे, सॅन मारिनो आणि पलाऊ यासारख्या लहान देशांचा समावेश आहे. सभेमध्ये, जमैका हा आयपीयुचा 181 वा सदस्य देश बनला. पुढील सभेचे आयोजन उझबेकिस्तान करणार असून, या देशाने 5-9 एप्रिल, 2025 दरम्यान ताश्कंद येथे होणार्या 150 व्या सभेसाठी आयपीयुच्या सर्व सदस्य संसदांना आमंत्रित केले आहे.
COMMENTS