नवी दिल्ली :ऑपरेशन सिंदूर अजुनही संपलेले नसून, पाकिस्तानने बुधवारी मध्यरात्री भारतीय सीमेवरील लष्कराच्या तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
नवी दिल्ली :ऑपरेशन सिंदूर अजुनही संपलेले नसून, पाकिस्तानने बुधवारी मध्यरात्री भारतीय सीमेवरील लष्कराच्या तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भारतीय लष्कराने गुरूवारी पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देत थेट पाकिस्तानातील लाहोरपर्यंत ड्रोन हल्ले करत अनेक दहशतवादी तळ नष्ट केले आहे.
भारतीय वायूदलाने ड्रोनचा वापर करुन लाहोरमधील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम आणि रडार यंत्रणा उद्ध्वस्त केल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तान भारतावर मोठा हल्ला करण्याच्या प्रयत्नात होता. हा हल्ला उधळून लावण्यासाठी भारताने ड्रोन हल्ला करुन पाकिस्तानची एचक्यू-9 रडार यंत्रणा उद्ध्वस्त केली, अशी माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली. पाकिस्तानकडून अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज या 15 ठिकाणी भारतीय लष्कराचे तळ लक्ष करण्याचा पाकिस्तानने प्रयत्न केला. पाकिस्तानने ड्रोन आणि मिसाईलचा वापर केला. आम्ही हाणून पाडला. डेब्रिज गोळा करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली आहे. 7 आणि 8 मे 2025 च्या रात्री पाकिस्तानने अवंतिपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नाल, फाळोदी, उत्तरलाई आणि भुज यांसारख्या उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी ठिकाणांवर ड्रोन व क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या सर्व हल्ल्यांना इंटिग्रेटेड काउंटर यूएएस ग्रिड आणि एअर डिफेन्स सिस्टमने यशस्वीरित्या निष्प्रभ केले. या हल्ल्यांचे अवशेष अनेक ठिकाणी सापडले असून, पाकिस्तानी हल्ल्याचा पुरावा म्हणून त्याची नोंद घेतली जात आहे. पहलगाम हल्ल्याला भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरद्वारे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यानंतर भारत पुन्हा एकदा पाकिस्तानला जोरदार दणका देण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.
पाकिस्तानच्या 9 शहरांवर ड्रान हल्ले
ऑपरेशन सिंदूरच्या दुसर्या दिवशी, भारताने पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. गुरुवारी सकाळी भारताने केलेल्या हल्ल्यात, पाकिस्तानच्या तीन प्रमुख शहरांमध्ये, लाहोर, कराची आणि रावळपिंडीमध्ये स्थापित केलेले एचक्यू-9 हवाई संरक्षण प्रणाली नष्ट झाली. या हल्ल्यासाठी भारताने इस्रायली हार्पी ड्रोनचा वापर केला. भारताने पाकिस्तानच्या 9 शहरांमध्ये ड्रोन हल्ले केले. लाहोरमध्ये 4 पाकिस्तानी लष्करी जवान जखमी झाले आणि मियांपूरमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला.
COMMENTS