नवी दिल्ली प्रतिनिधी - दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. दिल्लीत आज निवड समितीची बैठक पार पडली आहे. या बैठकीत T20
नवी दिल्ली प्रतिनिधी – दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. दिल्लीत आज निवड समितीची बैठक पार पडली आहे. या बैठकीत T20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बैठकीत निवड समितीने कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विरोट कोहलीला एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांमध्ये विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे आता रोहित शर्मा आणि विराट कोहली टी-20 आणि एकदिवसीय सामन्याला मुकणार असून दोघेही कसोटी मालिकेत खेळणार आहेत. एकदिवसीय सामन्यांसाठी के.एल. राहुलवर कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आलीयं. तर टी-20 सामन्यासाठी कर्णधारपदाची जबाबदारी सुर्यकुमार यादवकडे देण्यात आली आहे. तर मोहम्मद शमीवर सध्या वैद्यकीय उपचार सुरु असून शमी खेळणार की नाही हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असणार आहे. या दौऱ्याची सुरुवात टी-२० मालिकेने होणार आहे. त्यानंतर 17 डिसेंबरपासून एकदिवसीय मालिका सुरू होणार आहेत. तर 26 डिसेंबरपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. दुसरी कसोटी नवीन वर्षात म्हणजे 2024 मध्ये 3 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळवली जाणार आहे.
कसोटीसाठी भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयसवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड़, इशान किशन (यष्टीरक्षक), केएल राहुल ( यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (उप कर्णधार), प्रसिद्ध कृष्णा.
टी२० सामन्यांसाठी भारतीय संघ – यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उप कर्णधार), वॉशिंग्टन सुनील, रविंद्र जडेजा. कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.
टी२० मध्ये रविंद्र जडेजाचं पुनरागमन– सूर्यकुमार यादवला टी-२० संघाचे कर्णधारपद देण्यात आलंय. त्याचबरोबर रविंद्र जडेजाला उप कर्णधारपद देण्यात आलंय. संघात बहुतेक तेच खेळाडू आहेत जे सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानात टी-२० मालिका खेळत आहेत.
COMMENTS