Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारतीय वंशाच्या चंद्रिका टंडन यांना ग्रॅमी पुरस्कार

नवी दिल्ली : भारतीय वंशाच्या चंद्रिका टंडन यांनी पहिला ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे. यावर्षी निर्माते रिकी केज, सितारवादक अनुष्का शंकर आणि भारतीय व

मुंबई पालिकेतील कोविड सेंटर भ्रष्टाचारप्रकरणी मनसेची ईडीकडे तक्रार
गहूनंतर साखरेच्या निर्यातीवर बंदी
आरोग्य धोरण आवश्यक!

नवी दिल्ली : भारतीय वंशाच्या चंद्रिका टंडन यांनी पहिला ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे. यावर्षी निर्माते रिकी केज, सितारवादक अनुष्का शंकर आणि भारतीय वंशाच्या ब्रिटिश कलाकार राधिका वेकारिया यांनाही नामांकन मिळाले होते. संगीत क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित 67 वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा सोमवारी पार पडला. या पुरस्कार सोहळ्या भारतीय वंशाच्या ग्लोबल बिझनेस लीडर आणि संगीतकार चंद्रिका टंडन यांनी बाजी मारली. ‘त्रिवेणी’ या अल्बमसाठी त्यांना ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे.
प्राचीन मंत्र आणि जागतिक संगीत यांचा सुंदर मिलाफ या अल्बममध्ये पहायला मिळतो. 71 वर्षीय चंद्रिका टंडन यांनी ‘बेस्ट न्यू एज’, ‘चांट अल्बम’ श्रेणीमध्ये हा पुरस्कार आपल्या नावे केला आहे.

COMMENTS