Homeताज्या बातम्याक्रीडा

भारताचा क्रिकेटपटू शिखर धवनकडून निवृत्ती जाहीर

भारतीय क्रिकेटसंघाचा ‘गब्बर’ अर्थात भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनने क्रिकेटला अलविदा केलं आहे. आता तो आंतरराष्ट्रीय सामने खेळताना दिसणार नाही. सोश

पंचांनीच हरवायचे ठरवले तर जिंकणार कसे ?
आशियाई स्पर्धेत अरूणाचलच्या खेळांडूना चीनने प्रवेश नाकारला
ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा सुरू होण्याआधी फिंचने घेतली निवृत्ती

भारतीय क्रिकेटसंघाचा ‘गब्बर’ अर्थात भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनने क्रिकेटला अलविदा केलं आहे. आता तो आंतरराष्ट्रीय सामने खेळताना दिसणार नाही. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शिखरने याबाबतची माहिती दिली आहे. माझ्या क्रिकेट प्रवासाचा हा अध्याय संपवतोय. यावेळी मी माझ्या मनात असंख्य आठवणी दाटून आल्या आहेत. मी कृतज्ञ आहे. लोकांनी दिलेलं प्रेम आणि सपोर्टसाठी मी आभारी राहिन, सगळ्यांचे धन्यवाद, अशी पोस्ट शिखरने शेअर केलीय. आपल्या व्हिडीओत त्याने क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे. शिखर धवनने आंतराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे. त्याने साधारण 1 मिनिट 17 सेकंदांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याच्या या व्हिडीओमध्ये त्याने सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत. क्रिकेट शिकवणारे त्याचे गुरु, सहकारी, बीसीसीआय, आयसीसी अशा सर्वांचे आभार मानत धवनने क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे.

COMMENTS