Homeताज्या बातम्यादेश

इंडिया आघाडीला बाहेरून पाठिंबा देवू

तृणमूल काँगे्रसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांची घोषणा

कोलकाता ः लोकसभा निवडणुकीच्या वेळी पश्‍चिम बंगालमध्ये स्वबळावर निवडणूक लढणारा तृणमूल काँगे्रसच्या अध्यक्षा आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता

जलजीवन योजेनेत वागदर्डी धरणातून दरेगाव या गावाला शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा
Yeola : घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश (Video)
शंकर भालेकर यांचे निधन

कोलकाता ः लोकसभा निवडणुकीच्या वेळी पश्‍चिम बंगालमध्ये स्वबळावर निवडणूक लढणारा तृणमूल काँगे्रसच्या अध्यक्षा आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जर इंडिया आघाडीची सत्ता आल्यास बाहेरून पाठिंबा देवू अशी घोषणा केली आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी इंडिया आघाडीचे सरकार आल्यास सत्तेत थेट सहभागी होणार नसल्याचे त्यांच्या संकेतावरून दिसून येत आहे.
पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी काँगे्रससोबत आघाडी न करता स्वबळावर निवडणूक लढवत आहे. त्यांचा प्रतिस्पर्धी भाजप असला तरी, त्यांच्याशी त्या एकट्या लढत देत आहे. त्या थेट भाजपवर हल्लाबोल करत असतांना त्यांना थेट इंडिया आघाडीमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे. त्यातच त्यांनी जर देशामध्ये इंडिया आघाडीचे सरकार आल्यास बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणाच केली आहे. ममता बॅनर्जी यांनी यावेळी आणखी एक भूमिका घेतली. पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा सीपीएम आणि काँग्रेसचा काहीही संबंध नाही. पश्‍चिम बंगालमध्ये सीपीएम आणि काँग्रेसची आघाडी आहे. त्यावरून ममता बॅनर्जी यांनी घणाघाती टीका केली. तसेच हे दोघे भाजपबरोबर असल्याचा आरोपही ममता बॅनर्जींनी केला. सध्या पश्‍चिम बंगालमध्ये काही मतदारसंघात सीपीएम, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस आमनेसामने आले आहेत, त्यामुळे ममता बॅनर्जींचा भाजपसोबत काँगे्रससोबत देखील खटके उडतांना दिसून येत आहे.

COMMENTS