Homeताज्या बातम्यादेश

जागतिक अर्थव्यवस्थेत भारत तिसर्‍या क्रमाकांवर येईल

सुरत डायमंड बोर्सच्या उद्घाटनात पंतप्रधान मोदींचा दावा

सुरत : जागतिक अर्थव्यवस्थेत भारत नक्कीच तिसर्‍या क्रमाकांवर जाणार असून, सरकारने येणार्‍या 25 वर्षाचेही लक्ष्य ठरवले आहे. 5 ट्रिलिअन डॉलर आणि 10 ट

नरेंद्र मोदी आज तिसर्‍यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दिल्ली मेट्रोमधून प्रवास

सुरत : जागतिक अर्थव्यवस्थेत भारत नक्कीच तिसर्‍या क्रमाकांवर जाणार असून, सरकारने येणार्‍या 25 वर्षाचेही लक्ष्य ठरवले आहे. 5 ट्रिलिअन डॉलर आणि 10 ट्रि्लअन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी काम केले जात असून आम्ही देशाच्या एक्स्पोर्टलाही रेकॉर्ड उंचीवर घेऊन जाण्यासाठी काम करत आहोत. यात सूरतच्या डायमंड इंडस्ट्रीची जबाबदारी वाढली असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.जगातील सर्वांत मोठं कार्यलाय असलेल्या सूरत डायमंड बोर्सचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, सूरत शहरालाही टार्गेट ठरवले पाहिजे. देशाच्या प्रगतीत सूरतची भागीदारी कशी वाढेल, हे सूरतने आता ठरवले पाहिजे. डायमंड सेक्टर जेम्स आणि ज्वेलर्ससाठी आव्हानही आहे आणि संधीही आहे. डायमंड ज्वेलरी एक्स्पोर्टमध्ये भारत पुढे आहे. सिल्वर कट डायमंडमध्येही आपण अग्रणी आहोत. जगातील एकूण एक्स्पोर्टमध्ये भारताची टक्केवारी फक्त साडेतीन टक्के आहे. सूरतने ठरवले तर जेम्स आणि ज्वेलरी एक्स्पोर्टमध्ये आपण डबल डिजिटमध्ये येऊ शकतो, असाही विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. मी गॅरंटी देतो की तुमच्या प्रत्येक प्रयत्नात सरकार तुमच्यासोबत आहे. आम्ही सुरुवातीपासूनच या सेक्टरला एक्स्पोर्ट प्रमोशनसाठी फोकस एरिआ ठरवलं आहे. अनेक प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. आपल्या या प्रयत्नांचा जास्तीत जास्त फायदा उठवायचा आहे. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा बोलबाला आहे. जगभर भारताची चर्चा आहे, असे मोदी म्हणाले. तुम्हा सर्वांचे सामर्थ्य वाढवण्यासाठी सरकार सुरतचेही सामर्थ्य वाढवत आहे. आमचे सरकार सूरतमध्ये आधुनिक पायाभूत सुविधांसाठी विशेष प्रयत्न करत आहे. सुरतमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ आहे. सूरतमध्ये मेट्रो रेल्वे सेवा आहे. सूरत पोर्टमध्ये अनेक महत्त्वाच्या उत्पादनांची एक्स्पोर्टसाठी बंदर आहे, सूरत सातत्याने आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्राशी जोडले जात आहे. अशी आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी जगातील फार कमी शहरात असे आहे. सूरतला बुलेट ट्रेन प्रकल्पाशीही जोडलं आहे. वेस्टर्न डेडिकेट फ्रेट कॉरिडॉरवरही काम सुरू आहे. यामुळे, उत्तर-पूर्व भारतपर्यंत सूरतची रेल कनेक्टिव्हीट सशक्त होईल, असा आशावाद पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.

देशाला जागतिक स्तरावर हिरे व्यापाराची संधी मिळेल – गेल्या काही वर्षांत सुरत हे नवे व्यापारी पेठ म्हणून उदयाला येत आहे. त्यामुळे येथे आता सराफा बाजार केंद्र निर्माण करण्याच्या उद्देशाने सूरत डायमंड बोर्स तयार करण्यात आले आहे. यामुळे देशाला जागतिक स्तरावर हिरे व्यापार करण्यास संधी मिळेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. सूरत डायमंड बोर्सचे उद्घाटन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जमलेल्या जनतेशी संवाद साधला.

COMMENTS