नवी दिल्ली ः भारताने तंत्रज्ञानाच्या बाबतीत नेहमीच आघाडी घेण्याचा प्रयत्न केला असून, देशामध्ये वेगाने 5-जीचा विस्तार हो आहे. एवढेच नव्हे तर, 6 जी
नवी दिल्ली ः भारताने तंत्रज्ञानाच्या बाबतीत नेहमीच आघाडी घेण्याचा प्रयत्न केला असून, देशामध्ये वेगाने 5-जीचा विस्तार हो आहे. एवढेच नव्हे तर, 6 जीच्या क्षेत्रातही आपण वेगाने पुढे जात आहोत. आमच्या सरकारच्या काळात 4-जीचा विस्तार झाला, मात्र आमच्यावर एकही डाग लागला नाही. 6-जीच्या क्षेत्रात देखील भारत जगाचे नेतृत्व करेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. दिल्लीमध्ये शुक्रवारपासून इंडिया मोबाईल काँग्रेसला सुरुवात झाली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी देशभरातील निवडक संस्थांमधील 100 नवीन 5 जी लॅबचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आपल्या देशात 5 जी नेटवर्क विस्तारत आहे. मोबाइल ब्रॉडबँड स्पीडच्या बाबतीत आपण जगात 43 व्या क्रमांकावर आहोत. आमच्या सरकारच्या काळात देशात 4 जी सेवा विस्तारली. आता आपण 6 जी तंत्रज्ञानाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. 2014 मध्ये काय झाले होते, माहितीय ना? 2014 ही केवळ तारीख नाही तर एक परिवर्तन आहे. 2014 मध्ये देशात केवळ 100 स्टार्टअप होते, आज देशात 1 लाख स्टार्टअप आहेत. तुम्ही 10-12 वर्षांपूर्वीचा काळ आठवून पाहा. तेव्हा आऊटडेटेड मोबाईल फोनची स्क्रीन सतत हँग व्हायची. तुम्ही त्याची बटने दाबा, स्क्रीन स्वाईप केली तरी फोन काम करत नव्हते. ते फोन रिस्टार्ट करूनही काहीच होत नव्हते. अशीच अवस्था देशातल्या तेव्हाच्या सरकारची होती. तेव्हाचे सरकार हँग व्हायचे. मोबाईलची आणि देशाची परिस्थिती पाहता देशातल्या लोकांनी आऊटडेटेड फोन आणि आऊटडेटेड सरकार सोडून आम्हाला संधी दिली. 2014 मध्ये नागरिकांनी आम्हाला देशाची सेवा करण्याची संधी दिली. या परिवर्तनामुळे काय झालं ते सांगायची आवश्यकता नाही. कारण तंत्रज्ञानाच्या जगात आता सगळे काही स्पष्ट दिसत आहे. तेव्हा आपण मोबाईल फोन आयात करत होतो. आता आपण मोबाईल फोनची निर्यात करतो, असा हल्लाबोल पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला.
देशातील स्टार्टअप्सची संख्या एक लाखांच्यावर – पंतप्रधान मोदी म्हणाले, की 2014 पूर्वी देशात सुमारे 100 स्टार्टअप होते. ही संख्या आज 1 लाखांच्या वर गेली आहे. अगदी कमी काळात आपण युनिकॉर्न कंपन्यांचं शतक पूर्ण केलं आहे. तर, जगातील टॉप 3 स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये भारताचा समावेश झाला आहे. देशातील स्टार्टअप्सना प्रेरणा देण्यासाठी इंडियन मोबाईल काँग्रेसने ’अस्पायर’ अभियानाची सुरुवात केल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.
COMMENTS