Homeताज्या बातम्याक्रीडा

6 ऑक्टोंबररोजी ढाका येथे भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना

नवी दिल्ली / प्रतिनिधी : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याचा थरार आता पुन्हा एकदा चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. भारत आणि पाकिस्तान य

महाराष्ट्र केसरी पै. बाला रफीक शेख याने मारले पणुंब्रेचे मैदान
पॅराऑलिम्पिकमध्ये भारताची पदकांची लयलूट… जिंकली चार पदके
ओम कदम याला बॉक्सिंगमध्ये सुवर्ण पदक

नवी दिल्ली / प्रतिनिधी : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याचा थरार आता पुन्हा एकदा चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा 6 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. हा सामना ढाका येथील शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आणि सिल्हेटमधील सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहेत,  अशी माहिती आयसीसीने दिली आहे.
भारताचा महिलांच्या टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत ‘अ’ गटात समावेश करण्यात आला आहे. या गटात भारतासह पाकिस्तान, गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या संघांचा समावेश आहे. त्यामुळे भारतीय महिला संघाची कसोटी लागणार आहे. भारतीय महिलांची पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुध्दची लढत सहा ऑक्टोबरला होणार आहे. महिला टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा 3 ते 20 ऑक्टोबरदरम्यान बांगलादेशात होणार आहे.
दहा संघांचा समावेश असलेल्या नवव्या वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक आयसीसीने रविवारी जाहीर केले. भारताच्या गटातील सर्व लढती सिल्हेट येथे होणार आहेत. ‘प्रत्येक संघ गटात चार लढती खेळणार आहे. अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत दाखल होतील. या लढती 17 आणि 18 ऑक्टोंबरला होतील. त्यानंतर 20 ऑक्टोंबरला ढाक्यात अंतिम लढत होईल, असे आयसीसीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर म्हटले आहे. या वर्ल्ड कपमधील सर्व लढती ढाका येथील शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आणि सिल्हेटमधील सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहेत.

COMMENTS