Homeताज्या बातम्यादेश

भारताकडून जागतिक सहकार चळवळीला नवा आयाम : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली :भारतात पसरलेली सहकार चळवळ संपूर्ण जागाला एक नवी दिशा दाखवेल, या जागतिक सहकार परिषदेच्या माध्यमातून भारताला भविष्यामध्ये सहकारी क्षेत्

रेणापूर बाजार समिती लातूरप्रमाणे विकसित करणार
धनगरांच्या एसटी आरक्षणास आमदारांचा विरोध
कोरोनामुळं मृत झालेल्यांना भरपाई अशक्य l DAINIK LOKMNTHAN

नवी दिल्ली :भारतात पसरलेली सहकार चळवळ संपूर्ण जागाला एक नवी दिशा दाखवेल, या जागतिक सहकार परिषदेच्या माध्यमातून भारताला भविष्यामध्ये सहकारी क्षेत्रातील प्रवास करण्यासाठी एक नवीन, आगळी अंतर्दृष्टी प्राप्त होईल. आणि त्याचबरोबर भारताच्या अनुभवांमुळे वैश्‍विक स्तरावरील सहकारी चळवळीला नवा आयाम मिळेल असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भारतामध्ये प्रथमच आयोजि जागतिक सहकार परिषदेला संबोधित करतांना पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी भूतानचे पंतप्रधान फिजीचे उपपंतप्रधान, भारताचे सहकार मंत्री अमित शाह, आंतरराष्ट्रीय सहकार आघाडीचे अध्यक्ष, संयुक्त राष्ट्राचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पंतपधान मोदी म्हणाले की, भारतातील कोट्यवधी शेतकरी बांधव, भारतातील कोट्यवधी पशुपालक, मच्छीमार, भारतातील आठ लाखांपेक्षा जास्त सहकारी संस्था, स्वयंमदत समूहाबरोबर जोडल्या गेलेल्या 10 कोटी महिला आणि सहकारी क्षेत्रातील तंत्रज्ञानाने जोडले जाणारे भारतातील नवयुवक, अशा सर्वांच्या वतीने मी आपले भारतामध्ये स्वागत करतो. आंतरराष्ट्रीय सहकारी आघाडीच्या जागतिक परिषदेचे प्रथमच भारतामध्ये आयोजन केले जात आहे. भारतामध्ये सध्याच्या काळात आम्ही सहकारी चळवळीचा नव्याने विस्तार करीत आहोत. मला पूर्ण विश्‍वास आहे की, या परिषदेच्या माध्यमातून भारताला भविष्यामध्ये सहकारी क्षेत्रातील प्रवास करण्यासाठी एक नवीन, आगळी अंतर्दृष्टी प्राप्त होईल. आणि त्याचबरोबर भारताच्या अनुभवांमुळे वैश्‍विक स्तरावरील सहकारी चळवळीलाही 21व्या शतकातील नवीन साधने मिळतील. नवीन चैतन्य मिळेल. वर्ष 2025 हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केल्याबद्दलन मी संयुक्त राष्ट्र संघाचेही खूप खूप अभिनंदन करतो. जगासाठी सहकारी संस्था एक मॉडेल आहेत. परंतु भारतासाठी सहकार हा संस्कृतीचा आधार आहे, जीवनशैली आहे.

सहकारात भारताला विकसित बनविण्याची ताकद
आज भारतामध्ये आम्ही सरकार आणि सहकाराची शक्ती एकमेकांना जोडून भारताला विकसित बनविण्यासाठी कार्यरत आहोत. आम्ही ‘सहकार से समृद्धी’ असा मंत्रजप करीत पुढे वाटचाल करीत आहोत. भारतामध्ये आज 8 लाख सहकारी समित्या आहेत. याचा अर्थ जगातील एकूण सहकारी संस्थाचा विचार केला तर, त्यापैकी दर चौथी सहकारी समिती आज भारतामध्ये आहे. आणि ही संख्याच मोठी आहे असे नाही, तर त्यांच्या कामाच्या व्याप्तीमध्येही तितकीच विविधता आहे आणि व्यापकता आहे. ग्रामीण भारताचा जवळपास 98 टक्के भाग सहकार क्षेत्रातील संस्थांनी व्यापलेला आहे. जवळपास 30 कोटी लोक म्हणजे जगातील प्रत्येक पाचपैकी आणि भारतामध्ये प्रत्येक पाचमध्ये एक भारतीय सहकारी क्षेत्राशी जोडला गेला आहे. साखर असेल, खते असतील, मत्स्य व्यवसाय असेल, दूध उत्पादन असेल… अशा अनेक क्षेत्रांमध्ये सहकाराची खूप मोठी भूमिका असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

COMMENTS