जगातील पाच मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत ही पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. त्याच्यापुढे अमेरिका, चीन, जर्मनी, जपान आणि भारत या देशांचा समा

जगातील पाच मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत ही पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. त्याच्यापुढे अमेरिका, चीन, जर्मनी, जपान आणि भारत या देशांचा समावेश होतो. मात्र, नुकत्याच एका जागतिक पाहणीत केलेल्या सूचीमध्ये जगातील दहा देश जे स्थिर अर्थव्यवस्था म्हणून सर्वात अग्रेसर आहेत; अशा दहा देशांच्या यादीमध्ये अमेरिका, चीन आणि भारत यांचा समावेश कुठेही नाही. जगाच्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये टॉपवर असलेल्या जर्मनी आणि जपान या दोन देशांच्या अर्थव्यवस्थेला मात्र, स्थिर अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांच्या यादीत स्थान मिळाले आहे. या देशांच्या यादीमध्ये सर्वात प्रथम क्रमांकावर आहे युनायटेड अरब इमिरात; गल्फ देश ज्यांना आपण म्हणतो, त्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय, पाकिस्तान आणि बांगलादेशाचे मजूर आणि स्किलवर्कर जात असतात. परंतु, या देशांमध्ये जी गुंतवणूक झाली आहे ती अतिशय स्थिर आणि अतिशय मोठ्या प्रकल्पांमध्ये झालेली आहे. त्यामुळे या अर्थव्यवस्थेला जगातील पहिल्या क्रमांकाची स्थिर अर्थव्यवस्था मानली गेली आहे. या सूचीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर स्विझर्लंड या युरोपच्या पठारी किंवा मैदानी म्हटल्या जाणाऱ्या देशाचा दुसरा क्रमांक आहे. तर, याच यादीत तिसऱ्या स्थानावर जर्मनी आहे. तर चौथ्या स्थानावर कॅनडा या देशाचा समावेश आहे. जगाच्या पाच टॉपच्या अर्थव्यवस्थांमध्ये समाविष्ट असलेला जपानचा याही यादीमध्ये पाचव्या स्थानावर नंबर लागलेला आहे. अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. तर, चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचप्रमाणे, भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. पण जगातील सर्वात स्थिर अर्थव्यवस्थांच्या पहिल्या १० यादीत त्याचे नाव नाही. यूएई म्हणजे यूनाइटेड अरब एमिरातने पहिला क्रमांक मिळवण्याचं कारण म्हणजे की, या देशामध्ये अतिशय सूत्रबद्ध अशा गुंतवणूक योजना आहेत. त्याचप्रमाणे देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर हे देखील अतिशय सुटसुटीत आणि नियोजनबद्ध पद्धतीने उभारण्यात आले आहे. त्यामुळे जगातल्या गुंतवणूकदारांना आणि जगाच्या बाजारपेठेत वावर करणाऱ्या ग्राहकांना, आजही युनायटेड अमिरात हे देश आर्थिक दृष्ट्या सुरक्षित, गुंतवणुकीच्या दृष्टीने अत्यंत भरवशाचे आणि बाजारपेठ च्या अनुषंगाने अत्यंत सुपर बाजारपेठ असणारे वाटतात. त्यामुळे या देशात स्थिर अर्थव्यवस्था जगाला दिपवून टाकणारी आहे. अस आता स्पष्ट होत आहे. अर्थात, पाच मोठ्या अर्थव्यवस्थांचा नियोजनबद्ध गुंतवणूक असलेल्या देशांमध्ये ही समावेश होत असला तरी, सर्वच प्रकारच्या गुंतवणूक त्यांच्या सुनियोजित नाही किंवा पूर्णपणे सुरक्षितही नाहीत. कारण, कोणत्याही गुंतवणूकदाराला आपला उद्योग शंभर टक्के यशस्वी होण्याची हमी किंवा आपली गुंतवणूक पूर्णपणे यशस्वी होण्याची हमी ज्या अर्थव्यवस्थांमध्ये मिळते, त्याच अर्थव्यवस्था या दहा देशांपैकी आहेत. मात्र, त्यामध्ये चीन अमेरिका आणि भारत या जगाच्या पाठीवर अतिशय बलाढ्य असणाऱ्या देशांच्या वाट्याला ते आलं नाही. ही मात्र मोठ्या प्रमाणात विचार करायला लावणारी बाब आहे. अर्थात, अस्थिर अर्थव्यवस्था असणाऱ्या तीनही देशांचं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य जर आपण पाहिले, तर, हे देश मोठ्या प्रमाणात भाग भांडवलाच्या बाजारावर देखील आपली अर्थव्यवस्था अवलंबून ठेवतात. कोणताही भाग बाजार जगाच्या पाठीवर हा अस्थिर बाजारपेठेचा एक उत्कृष्ट नमुना असतो. त्यामुळे या बाजारपेठेतून कोणतीही अर्थव्यवस्था स्थिर होऊन ती विकासाकडे पूर्णपणे जाईल, असं स्पष्ट म्हणता येत नाही. उर्वरित जगाच्या यादीमध्ये ज्या देशांचा समावेश आहे त्यातील काही देशांमध्ये ही भाग बाजार आहे. परंतु, गुंतवणूकदारांच्या पैशाला अतिशय सुरक्षितपणे गुंतवण्याचा आणि त्याला त्याचा पैसा परतफेड होण्याची पूर्णपणे हमी असलेल्या या आर्थिक बाजारपेठा आहेत
COMMENTS