Homeताज्या बातम्यादेश

भारत-कॅनडामध्ये पुन्हा तणाव

अमेरिकेच्या दाव्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान आक्रमक

नवी दिल्ली ः स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणार्‍या गुरवतपंत सिंह पन्नूच्या हत्येच्या कटात भारतीय नागरिकांचा सहभाग असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे.

पंतप्रधान मोदींचा आज जिल्हाधिकार्‍यांशी संवाद ; देशातील 56 जिल्ह्यांत नगरचाही समावेश
हर्ष आणि भारतीच्या जामीनावर NCB नाराज!
संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी

नवी दिल्ली ः स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणार्‍या गुरवतपंत सिंह पन्नूच्या हत्येच्या कटात भारतीय नागरिकांचा सहभाग असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. निखिल गुप्ता नावाच्या भारतीय नागरिकावर या कटाचा ठपका ठेवण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा भारत-कॅनडा देशांमध्ये तणाव बघायला मिळतांना दिसून येत आहे. तर भारताने अमेरिकेच्या आरोपानंतर जोरदार प्रत्युत्तर देत आरोप फेटाळले आहे.

अमेरिकेने भारतीय नागरिकावर केलेल्या आरोपानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पुन्हा भारतावर निशाणा साधला आहे. त्यामुळे निज्जर प्रकरणावरून दोन्ही देशांच्या ताणलेल्या संबंधामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सहा महिन्यांपूर्वी हरदीप सिंह निज्जर या खलिस्तानी समर्थकाची कॅनडात हत्या करण्यात आली होती. त्यावरून कॅनडाने भारतावर आरोप केल्यानंतर दोन्ही देशांचे संबंध ताणले आहेत. अमेरिकेने भारतीय नागरिक निखिल गुप्तावर न्यूयॉर्क शहरातील नागरिकाच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. यात पन्रूचे नाव घेण्यात आलेले नाही. मागच्या आठवड्यात एका ब्रिटीश पर्तमानपत्राने, अमेरिकेने पन्नूच्या हत्येचा कट उधळवून लावल्याचा दावा केला होता. यावरून कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर निशाणा साधला आहे. अमेरिकेने भारतावर जे आरोप लावलेत, त्याविषयी आपण सुरुवातीपासून बोलत होतो. आता अमेरिकने केलेल्या या आरोपानंतर आमची अधोरेखित झाली आहे. त्यामुळे भारताने अशा प्रकारचे आरोप गांभीर्याने घेतले पाहिजेत, असे ट्रुडो यांनी म्हटले आहे.काही दिवसांपूर्वी हरदीप सिंग या खलिस्तानी समर्थकाची कॅनडातील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली होती. मात्र तब्बल दोन महिन्यांनंतर ट्रुडो यांनी कॅनडाच्या संसदेत भारतीय अधिकार्‍यांचा या हत्येमागे हात असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यामुळे दोन्ही देशांचे संबंध ताणले आहेत.

भारताचे अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर- स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणार्‍या गुरवतपंत सिंह पन्नूच्या हत्येच्या कटात भारतीय नागरिकाचा सहभाग असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. यात भारताचा सहभाग असल्याचा आरोप केल्यानंतर भारतानेही अमेरिकेला उत्तर दिले आहे. हा प्रकार आमच्या देशाच्या धोरणांविरोधात असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने भारतीय नागरिकावर केलेल्या गंभीर आरोपांवर भारतीय विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते अरविंदम बागची यांनी गुरुवारी, अमेरिकेत एका व्यक्तीची हत्या होते आणि त्यात भारतीय अधिकार्‍याचा संबंध असणे चिंताजनक आणि सरकारी धोरणांच्या विरोधात असल्याच म्हटले आहे.

COMMENTS