Homeताज्या बातम्यादेश

इंडिया आघाडीची 19 डिसेंबरला बैठक

लोकसभेच्या जागा वाटपावर चर्चा होण्याची शक्यता

नवी दिल्ली ः नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकी तेलंगणा वगळता इतर राज्यात काँगे्रसचा पराभव झालेला आहे. विरोधकांनी आम्हाला सोबत न

इस्रोच्या गगनयानाची पहिली उड्डाण चाचणी यशस्वी
कांद्यासह भाजीपाल्याचे भाव गडगडल्याने शेतकरी अडचणीत
पेटलेली ट्रेन रुळावर धावत राहिली

नवी दिल्ली ः नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकी तेलंगणा वगळता इतर राज्यात काँगे्रसचा पराभव झालेला आहे. विरोधकांनी आम्हाला सोबत न घेतल्यामुळे पराभव झाल्याची टीका केली होती. त्यानंतर इंडिया आघाडीची बैठक 6 डिसेंबरला होणार होती, मात्र ती बैठक पुढे ढकलण्यात आली होती. आता ही बैठक 19 डिसेंबरला होणार आहे.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक्स अकाउंटवर ट्वीट करत या बैठकीची माहिती दिली आहे. इंडिया आघाडीची चौथी बैठक मंगळवारी 19 डिसेंबर 2023 ला दुपारी 3 वाजता नवी दिल्लीत पार पडेल. जुडेगा भारत, जितेंगा इंडिया! असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हणले आहे. अखेर इंडिया आघाडीच्या चौथ्या बैठकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 19 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता नवी दिल्लीमध्ये ही बैठक होणार आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूकांमधील पराभवावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणूकांची रणनितीही ठरवली जाऊ शकते. सोबतच किमान समान कार्यक्रम आणि लोकसभेच्या जागावाटपाबाबत देखील बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

COMMENTS