Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

आरटीओ अधिकारी उन्हावणे व प्राचार्य जगताप यांनी केले ध्वजारोहण

अहमदनगर/प्रतिनिधी ः केडगाव येथील पोदार इंटरनॅशल स्कूल शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आरटीओ अधिकारी प्रियंका उन्हावणे व शाळेचे

*कोरोनाची औषधं आणि लसीवर जीएसटी कर का गरजेचा? पहा १२च्या १२ बातम्या | LokNews24*
अहमदनगर – औरंगाबाद रेल्वे मार्गाला चालना देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश; देवगड, नेवासा व शनिशिंगणापूरला होणार अधिक लाभ
कर्जत तालुक्यात डोक्यात दगड घालून खून

अहमदनगर/प्रतिनिधी ः केडगाव येथील पोदार इंटरनॅशल स्कूल शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आरटीओ अधिकारी प्रियंका उन्हावणे व शाळेचे प्राचार्य मंगेश जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी शाळेत सुंदर सजावट करण्यात आली होती. तिरंगा ध्वज आणि आणि तिरंगा पताकांनी शाळेचा परिसर सजवण्यात आला होता. विविधतेत एकता दाखवत शाळेतील विद्यार्थी संस्कृती शिंदे, दास्यभक्ती शेलार आणि प्रगती मांढरे यांनी भारतीय स्वातंत्र्याविषयी विद्यार्थ्यांना हिंदी, मराठी, इंग्रजी अशा विविध भाषात माहिती दिली.
शाळेतील विद्यार्थ्यांनी भगतसिंग, राजगुरू, लाला लजपतराय रॉय, सावित्री बाई फुले, छत्रपती शिवाजीमहाराज अशा विविध भूमिका सादर करून नाटकातून देशाविषयी, देशभक्ती, देशप्रेम याची माहिती देत शाळेचे वातावरण देशप्रेमाने प्रफुल्लित केले. यावेळी  देशभक्तीपर  गीते, समूह गाणी व नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले. याप्रसंगी पालक, परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जे पालक शाळेत उपस्थित राहू शकले नाही, अशा पालकांनी ऑनलाईन कार्यक्रमाचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थी वेदांत शिंदे आणि अनुष्का सांगळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी प्रजेश पाटील याने केले. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी विशेष प्रयत्न केले.

अपघातमुक्त भारत बनवण्याची घेतली शपथ – या कार्यक्रमात आरटीओ अधिकारी प्रियंका उन्हावणे यांनी विद्यार्थ्यांना संगितले की, भारताला अपघात मुक्त बनवण्याची तसेच माझी माती माझा देश याअंतर्गत पंचप्रण शपथ घेऊया, देशाचा विकास करूयात. यावेळी त्यांनी वाहुकीचे नियम पाळा. हेल्मेटचा व सीट बेल्टचा वापर गाडी चालवताना करा. असे आवाहन त्यांनी पालकांना केले. यावेळी शाळेचे शाळेचे प्राचार्य मंगेश जगताप म्हणाल की, स्वातंत्र्य भारताचे नागरिक म्हणून आपण आपली जबाबदारी, सर्व नियमाचे पालन करत पार पाडूयात. यावेळी त्यांनी विद्यार्थी व पालकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

COMMENTS