Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संत ज्ञानेश्‍वर स्कूलमध्ये स्वातंत्र दिन उत्साहात

Oplus_131072 कोपरगाव शहर ः संत ज्ञानेश्‍वर इंग्लिश मिडीअम स्कूल मध्ये 78 वा स्वातंत्र दिन अतिशय उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच

महसूलमंत्री ना. थोरात यांच्या नेतृत्वामुळे संगमनेरचा सहकार पॅटर्न दिशादर्शक – नामदार कदम
दुचाकी विहिरीत पडून एकाचा मृत्यू
प्रेम संबंध ठेवण्यास नकार देणार्‍या तरुणीचा विनयभंग
Oplus_131072

कोपरगाव शहर ः संत ज्ञानेश्‍वर इंग्लिश मिडीअम स्कूल मध्ये 78 वा स्वातंत्र दिन अतिशय उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारत माता, ज्ञानेश्‍वर माऊली, माता सरस्वती व छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करण्यात आले. झेंडा वंदन भारतीय सैन्य दलातील माजी सैनिक सुभेदार गोपीनाथ गांगुर्डे यांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय सैन्य दलातील माजी सैनिक हवालदार अजित आढाव होते. या प्रसंगी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे उपाध्यक्ष किरण भोईर, संचालक पोपट झुरळे, अ‍ॅड. शंकर यादव, दिलीप सोनवणे, कार्यकारी संचालक विशाल झावरे, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब भाबड, मुख्याध्यापक सचिन मोरे, इरफान शेख, राहुल देशपांडे, ललित ठोंबरे, सचिन मोरे,विजय शिंदे, अक्षय नन्नावरे, रवी पवार, दिपक दळे व नरेश बैरागी यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय शाळेच्या शिक्षिका चैताली पुंडे यांनी करून दिला. शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते भेट वस्तू देत गुण गौरव करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्ती पर गीतांवर संस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. तर भारतीय सैन्य दलातील निवृत्त सैनिक सुभेदार गोपीनाथ गांगुर्डे यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व्यक्त केल्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक सचिन मोरे व शिक्षिका प्रियांका निकम यांनी केले तर आभार मनीषा राऊत यांनी मानले.

COMMENTS