Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देवळाली प्रवरा नगरपालिकेत स्वातंत्र्य दिन उत्साहात

देवळाली प्रवरा ः भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देवळाली प्रवरा नगर पालिका कार्यालयाच्या प्रांगणात मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या हस्

रुईगव्हाणच्या सरपंचपदी इंदिरा निलेश पवार बिनविरोध
कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांनी नियमित मास्क वापरावे : पोलिस निरीक्षक जाधव
युवतीच्या वैद्यकीय उपचारांसाठी शिवसेना नगरसेवकांची मदत

देवळाली प्रवरा ः भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देवळाली प्रवरा नगर पालिका कार्यालयाच्या प्रांगणात मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. देवळाली प्रवरा शहरातील काकासाहेब चौकातील क्रांतीकारी स्मारकास मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
तर देवळाली प्रवरा येथील पोलिस चौकी, आरोग्य केंद्र, होमगार्ड कार्यालय, श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक, शाहु महाराज महाविद्यालय, वाड्या वस्त्यावरील जिल्हा परीषद मराठी शाळेत ध्वजारोहन झाल्यानंतर शासकीय वेळे नुसार नगर पालिका कार्यालयाच्या प्रांगणात मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, मुरलीधर कदम,माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, देवळाली पोलिस चौकीचे सहायक पोलिस उपनिरीक्षक विष्णू आहेर. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी,व कर्मचारी वर्ग, श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व स्काऊट गाईड, माजी सैनिक, होमगार्ड, नागरिक, नगरपालिका अधिकारी व कर्मचारी वर्ग आदी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर मुख्याधिकारी नवाळे व माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या हस्ते शांततेचे प्रतिक म्हणून कबुतरे हवेत सोडण्यात आले. मॅरेथॉन स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व नगर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांना गणवेश वितरण करण्यात आले. अग्निशमन विभागात आग नियंत्रणासाठी दुचाकीचे लोकापर्ण माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम यांच्या हस्ते विधीवत पूजा करुन करण्यात आले. मुख्याधिकारी नवाळे व माजी नगराध्यक्ष कदम यांनी शहरवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

COMMENTS