उच्च वायू प्रदूषणामुळे भारतात आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊन भारतातीयांना तीव्र श्वसन रोगांना सामोरे जावे लागत असल्याचे वैज्ञानिक म्हणत आहेत. अलि

उच्च वायू प्रदूषणामुळे भारतात आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊन भारतातीयांना तीव्र श्वसन रोगांना सामोरे जावे लागत असल्याचे वैज्ञानिक म्हणत आहेत. अलिकडे श्वसन रोगाच्या वाढलेल्या घटनांमध्ये थेट संबंध असल्याचे अभ्यास आणि वैज्ञानिक पुराव्यांवरून दिसून येते आहे, लॅन्सेट या वैज्ञानिक संस्थेने म्हटले आहे. परंतु, कोलंबियामध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) परिषदेच्या वेळी “वायू प्रदूषण आणि मृत्यू यांच्यात थेट संबंध नाही” असा भारत सरकारने आपल्या अहवालात म्हटले आहे. लॅन्सेट ही संस्था बदलत्या हवामानाच्या संदर्भात अभ्यास करणारी संस्था आहे. फुफ्फुसाचा कर्करोग, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा वाढता धोका आणि स्ट्रोक यासह वायू प्रदूषणाचे दीर्घकालीन आरोग्यावरील परिणामांवर या संस्थेने अभ्यास केला आहे. “वायू प्रदूषण हे माणसाच्या आयुष्यभर सर्व वयोगटातील लोकांच्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहे, याचे पुरावे वैज्ञानिक पुढे आणत आहेत. त्यामुळेच सरकारने विज्ञानाला मान्यता देणे आणि हवा स्वच्छ करणे इतके महत्त्वाचे आहे. मात्र, या संदर्भात भारताच्या आरोग्य राज्यमंत्री यांनी राज्यसभेत सांगितले होते की “केवळ वायू प्रदूषणामुळे मृत्यू आणि रोगाचा थेट संबंध सिध्द करणारा कोणताही निर्णायक डेटा देशात उपलब्ध नाही”, असे आपल्या उत्तरात म्हटले होते. मात्र, वायू प्रदूषण हे श्वसनाचे आजार आणि संबंधित आजारांना कारणीभूत ठरणारे एक घटक आहे, असे त्यांनी लेखी उत्तरात सांगितले. असे असले तरी यासंदर्भात कार्य करणाऱ्या लॅन्सेट या संस्थेने, “आरोग्य अनेक घटकांमुळे प्रभावित होते, ज्यात अन्न सवयी, व्यावसायिक सवयी, सामाजिक-आर्थिक स्थिती, वैद्यकीय इतिहास, पर्यावरणाव्यतिरिक्त व्यक्तींची प्रतिकारशक्ती, आनुवंशिकता इ. त्याचप्रमाणे “वायू प्रदूषणाची कोणतीही सुरक्षित पातळी नाही” “वायू प्रदूषणाच्या संपर्कात, येणाऱ्या कोणाचीही पर्वा न करता, प्रदूषण आपल्या फुफ्फुसांमध्ये प्रवेश करेल आणि आपल्या आरोग्याला, रक्त प्रणालीला आणि अंतर्गत अवयवांना नुकसान होईल.” “जागतिक आरोग्य संघटनेने वायू प्रदूषण हे एका निश्चित केलेल्या बिंदू च्या पुढे जायला नको, याची काळजी प्रत्येक देशाने घ्यावी अशी, सुचनाही केली आहे. भारतात, मोठ्या प्रमाणात, बहुतेक शहरे आणि ग्रामीण भागात वायू प्रदूषणाचा मापदंड ओलांडले गेले आहेत. त्यामुळे, स्थानिक लोकांच्या आरोग्यावर आणि अर्थव्यवस्थेवर त्याचप्रमाणे कामगार उत्पादकतेवर देखील याचा थेट परिणाम होत आहे. यामुळे देशाचे होणारे नुकसान खूप व्यापक असू शकते, लॅन्सेट संस्थेने म्हटले आहे. अर्थात, भारत सरकारने “वायू प्रदूषणाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत” आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) चे उद्दिष्ट महिला आणि बालकांना स्वच्छ एलपीजी पुरवून त्यांचे आरोग्य सुरक्षित करणे आहे. तथापि, गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या थिंक-टँक अहवालात असे दिसून आले आहे की ४१% भारतीय लोक अजूनही स्वयंपाकाचे इंधन म्हणून लाकूड, शेण किंवा इतर बायोमासवर अवलंबून आहेत. ही प्रथा एकत्रितपणे पर्यावरणात सुमारे साडेतीनशे दशलक्ष टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित करते, जी भारताच्या हरितगृह वायू उत्सर्जनाच्या अंदाजे १३% आहे, असे त्यात म्हटले आहे. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंना आळा घालण्यासाठी स्वच्छ हवेचे आवाहन करत आहेत. पन्नासहून अधिक देश, शहरे आणि संस्थांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या या सूचनांचे पालन करण्याची हमी दिली आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कार्टाजेना येथे वायू प्रदूषण आणि आरोग्य या विषयावरील दुसऱ्या परिषदेत वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी, सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी आणि २०४० पर्यंत त्याचे घातक परिणाम निम्मे करण्यासाठी प्रयत्नरत राहवं लागेल.
COMMENTS