Homeताज्या बातम्यासंपादकीय

वाढते हल्ले चिंताजनक  

जम्मू-काश्मीरचे नंदनवन आता दहशतवाद्यांचे नंदनवन होतांना दिसून येत आहे. वास्तविक पाहता गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दहशतवाद्यांचे हल्ले होतां

महाराष्ट्रात दिवाळीनंतरच निवडणूक !
ट्रम्प यांच्या हत्येमागचे षडयंत्र
हिंडेनबर्गचे भूत पुन्हा सज्ज

जम्मू-काश्मीरचे नंदनवन आता दहशतवाद्यांचे नंदनवन होतांना दिसून येत आहे. वास्तविक पाहता गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दहशतवाद्यांचे हल्ले होतांना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच 5 जवानांना वीरमरण प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा एका कॅप्टनसह चार जवानांना वीरमरण प्राप्त झाले आहे. जम्मू-काश्मीरच्या खोर्‍यात जे दहशतवादी लपून बसलेले आहेत, ते परदेशी असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेवून जम्मू-काश्मीर खोर्‍यात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. मात्र हा दहशतवाद ठेचून काढण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. जम्मू-काश्मीर खोर्‍यात ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणूका होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या प्रशिक्षित दहशतवाद्यांना या खोर्‍यात पाठवण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. मात्र या दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्याची वेळ आलेली आहे. गेल्या काही दिवसांत शहीद होणार्‍या जवानांची संख्या वाढतांना दिसून येत आहे. याविरोधात केंद्र सरकारने उपाययोजना हाती घेतल्या असून, जम्मू विभागात सर्वात मोठी शोधमोहीम राबविण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ड्रोनसह विविध माध्यमातून दोडा परिसरात तब्बल 24 दहशतवादी लपून बसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ही शोधमोहीम राबविण्यात येत असून, या मोहीमेत जम्मू-काश्मीर पोलिस दलाचे 7 हजार जवान, 8 ड्रोन आणि सुमारे 40 श्‍वान या दहशतवाद्यांचा शोध घेत आहे. वास्तविक पाहता जम्मू-काश्मीर सुंदर असे नंदनवन आहे. पर्यटकांना खुणावणारी ही जागा, मात्र दहशतवादी हल्ल्यांमुळे या क्षेत्राचा विकास होतांना दिसून येत नाही.

कलम 370 रद्द करून, जम्मू-काश्मीरला विकासाची संधी मिळत आहे. मात्र दहशतवाद या विकासाला दूर लोटतांना दिसून येत आहे. त्यामुळे दहशतवाद्यांचे जाळे समूळ उच्चाटन करण्याची खरी गरज आहे. आज भारतीय लष्कर आणि पोलिसांनी दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरू केली असली तरी, सीमपलीकडून येणारे घुसखोरांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. आज आपण या घुसखोरांचा बंदोबस्त करू, मात्र सीमेपलीकडून येणार्‍या दहशतवाद्यांचा बंदोबस्त कसा करणार हा महत्वाचा प्रश्‍न आहे. 24 दहशतवाद्यांचा शोध आज घेतला जात आहे. मात्र हे दहशतवादी कोणत्या मार्गाने या खोर्‍यात शिरले, कशापद्धतीने त्यांनी शस्त्रास्त्रे मिळवली, त्यांना सीमारेषेपासून आतमध्ये कसा प्रवेश मिळवला, या प्रश्‍नांचे उत्तर शोधण्याची गरज आहे. अणि दहशतवाद्यांनी घुसखोरी करूच नये, यासाठी कठोर उपाययोजना करण्याची खरी गरज आहे. शोधमोहीम घेत असलेल्या जवानांमध्ये बहुतांश राष्ट्रीय रायफल्स व पोलिस दलाचे स्पेशल कमांडोज आहेत. त्यांना डोडा व कठुआ जिल्ह्यांतील पीरपंजालच्या जंगलांत उतरवले आहे. येथील पाच ठिकाणांची मार्किंग केली आहे. ती ठिकाणे 120 चौरस किमीतील जंगलामध्ये आहेत. सुरक्षा दलांना येथे सुमारे 24 अतिरेकी असल्याचे पुरावे मिळाले. डोडाच्या जंगलात लष्करासोबत चकमक झालेलेही यात समाविष्ट आहेत. या चकमकीत 5 जवान शहीद झाले होते.

त्यानंतर आता केंद्राने आक्रमक पवित्रा घेत ही शोधमोहीम सुरू केली आहे. वास्तविक पाहता जम्मूतील हा दहशतवाद मोडीत काढता ही येईल, पण पाकिस्तानमधून ज्या कारवाया सुरू आहे, त्याचे प्रत्युत्तर देण्याची खरी गरज आहे. पाकिस्तानमध्ये अनेक तळ आहेत, जे दहशतवाद्यांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देतांना दिसून येत आहे. असे तळ नष्ट करण्याची गरज आहे. पाकिस्तान हा दहशतवाद्याला पोसत आहे, अनेक दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांनी तिथे आश्रय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे कंबरडे मोडण्याची खरी गरज आहे. पाकिस्तान दिवाळखेारीत निघालेला असतांना देखील पाकिस्तान विकासाची वाट धरतांना दिसून येत नाही. परिणामी पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय अस्थिरता दिसून येत आहे. त्यामुळे आंततराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानवर बहिष्कार कसा टाकता येईल या दृष्टीने प्रयत्न केल्यासच पाकिस्तानची नाकेबंदी करता येईल. 

COMMENTS