Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खा.संजय राऊत यांचा दौरा असल्याने नाशिक पोलिसांकडुन सुरक्षेत वाढ  

नाशिक प्रतिनिधी - आपल्याला जीवे मारण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून देण्यात आल्याचे संजय राऊत यांनी ट्विट द्वारे आणि गृहमंत्री

जेट एअरवेज होणार इतिहासजमा
तरूणाच्या डोक्यात कुर्‍हाडीने वार
शिकवणी वर्ग आणि शिक्षणव्यवस्था

नाशिक प्रतिनिधी – आपल्याला जीवे मारण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून देण्यात आल्याचे संजय राऊत यांनी ट्विट द्वारे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात म्हटले होते.त्यांनतर आता खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून ठाणे पोलिसांचे एक पथक संजय राऊत यांचा जबाब घेण्यासाठी नाशिकमध्ये दाखल झाले आहे..ठाणे एसीपी हे संजय राऊत यांचा जवाब नोंदवत आहे.ठाणे पोलिसांच्या 6 जणांचे पथक नाशिकच्या एक्स्प्रेस इन हॉटेल मध्ये दाखल झाले आहेत.तर याच बरोबर नाशिक पोलिसांकडून देखील संजय राऊत यांनी सुरक्षा देण्यात आली आहे त्यांनतर नाशिकच्या ग्रामीण भागात खा.संजय राऊत यांचा दौरा असणार आहे तर नाशिक ग्रामीण पोलिसांकडून देखील त्यांना सुरक्षा देण्यात येणार आहे.

COMMENTS