फेबु्रवारीच्या पहिल्या आठवडयात रुग्ण संख्या वाढण्याचा अंदाजमुंबई/प्रतिनिधी ः राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठया प्रमाणावर वाढ होत असून, काल तब्
फेबु्रवारीच्या पहिल्या आठवडयात रुग्ण संख्या वाढण्याचा अंदाज
मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठया प्रमाणावर वाढ होत असून, काल तब्बल 46 हजारांच्या वर रुग्ण आढळून आले होते. मात्र रुग्णालयात दाखल होणारे आणि ऑक्सिजनची आवश्यकता भासणारी रुग्ण संख्या कमी असल्यामुळे लॉकडाऊन लावता येणार नाही. दररोज ज्यादिवशी 700 मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवशी राज्यात लॉकडाऊन केले जाईल, असा इशारा यापूर्वीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. मात्र राज्यात ऑक्सिजनची मागणी वाढली असून, ती आता एका दिवसासाठी 400 मेट्रिक टनवर आली आहे.
महाराष्ट्रात जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल होणार्या करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात वैद्यकीय उपकरणांसह ऑक्सिजनच्या रोजच्या गरजेत वाढ झाली आहे. सध्या दिवसाला राज्यात 400 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सांगितले की, ऑक्सिजनची मागणी 700 मेट्रिक टनांपर्यंत वाढल्यास कडक निर्बंध घालावे लागतील. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने लसीकरणाला गती देऊन आवश्यक ती पावले उचलावीत. पुढे ते म्हणाले की, पूर्णपणे लसीकरण झालेल्या करोना रुग्णांना वैद्यकीय ऑक्सिजनची आवश्यकता नसते. परंतु लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील गुरूवारी देशभरातील मुख्यमंत्र्यासोबत संवाद साधत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी लसीकरण वाढवण्याच्या सूचना केल्या असून, ज्या राज्यात रुग्णांची संख्या वाढत आहे, त्या राज्यांनी ऑक्सिजनचे प्रकल्प कार्यान्वित करून, आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही कारणास्तव पंतप्रधान मोदी यांच्या या बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहु शकले नाही. मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीची माहिती पंतप्रधान मोदी यांना दिली.
COMMENTS